KL Rahul-Athiya Wedding : राहुल-अथियाला लग्नात करोडोंचं गिफ्ट, कोणी ऑडी तर कोणी दिलं 30 लाखांचं घड्याळ

KL Rahul-Athiya Wedding : टीम इंडियाचा स्टार खेळाडू के एल राहुल (KL Rahul) आणि अभिनेता सुनिल शेट्टीची (Suniel Shetty) मुलगी अभिनेत्री अथिया शेट्टी (Athiya Shetty) यांचा विवाह अखेर पार पडला. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानतंर त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. सुनील शेट्टी यांच्या खंडाळा इथल्या बंगल्यात हा शाही विवाहसोहळा पार पडला. बॉलिवड (Bollywood) आणि क्रिकेट जगतातील सेलिब्रेटिंबरोबरच काही जवळच्या नातेवाईकांच्या उपस्थित पार पडला. राहुल-अथिया जोडीला लग्नात (KL Rahul-Athiya Wedding) मौल्यवान आणि महागडे गिफ्ट (Gift) मिळालेत. जाणून घेऊन कोणी काय गिफ्ट दिलेत. 

Jan 25, 2023, 14:02 PM IST
1/6

सुरुवात करुया अथिया शेट्टीचे वडिल आणि बॉलीवूड अभिनेते सुनील शेट्टी यांच्यापासून. सुनील शेट्टी यांनी आपल्या लाडक्या लेकीला लग्नाचं गिफ्टच्या रुपात मुंबईत एक अलिशान अपार्टमेंट भेट दिलं आहे. याची किंमत जवळपास 50 कोटी रुपये असल्याचं सांगितलं जात आहे.

2/6

बॉलिवूडचा भाईजान अर्थात सलमान खान (Salman Khan) हा सुनील शेट्टीचा अगदी जवळचा मित्र समजला जातो. त्यामुळे आपल्या खास मित्राच्या मुलीला लग्नानिमित्ताने त्याने ऑडी कार गिफ्ट (Audi Car) केली आहे, याची किंमत 1 कोटी 63 लाख इतकी आहे.

3/6

जॅकी श्रॉफ (Jacky Shroff) आणि सुनील शेट्टीही अगदी जवळचे मित्र मानले जातात. जॅकी दादा अथियाला आपल्या मुलीसारखं मानतात. त्यामुळे या खास क्षणी त्यांनी चोपार्ड (Chopard) या महागड्या ब्रँडच घड्याळ तिला भेट दिली आहे, ज्याची किंमत 30 लाख रुपये आहे.

4/6

अथिया शेट्टीच्या अगदी खास मित्रांमध्ये अभिनेता अर्जुन कपूरचा (Arjun Kapur) समावेश होतो. आता आपल्या जवळच्या मैत्रिणींच लग्न आहे म्हणजे गिफ्टही खासच असणार. अर्जुन कपूरने अथियाला दीड कोटी रुपयांचं सोन्याचं ब्रेसलेट (Gold Bracelet) भेट दिलं आहे. 

5/6

बॉलिवूड स्टार्सबरोबरच क्रिकेटर्सनेही महागडी गिफ्ट नवदाम्पत्याला दिली आहेत. टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर विराट कोहलीने (Virat Kohli) के एल राहुलला महागडी बीएमडब्ल्यू कार (BMW Car) भेट दिली आहे याची किंमत जवळपास 2.17 कोटी रुपये इतकी आहे. 

6/6

टीम इंडियाचा सर्वात यशस्वी कर्णधार माही अर्थात महेंद्रसिंग धोणी (M S Dhoni) हा बाईकप्रेमी असल्याचं सर्वांना माहित आहे. त्यामुळे त्याने राहुलच्या लग्नात कवासकी निंजा (Kawasaki Ninja) बाईक गिफ्ट केली आहे. बाजारात याची किंमत जवळपास 80 लाख रुपये इतकी आहे.