मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात 'या' गोष्टींचा समावेश करा

आज १४ नोव्हेंबर हा दिवस World Diabetes Day म्हणून साजरा केला जातो. संपूर्ण जगात मधुमेहाचे रुग्ण अतिशय मोठ्या संख्येने वाढत आहेत. याबाबतीत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. मधुमेहाचे (डायबिटीज) तीन टाइप असतात. डायबिटीज टाइप-१, डायबिटीज टाइप-२ आणि डायबिटीज टाइप-३सी. डायबिटीज झाल्यावर शरीर कमकुवत होण्यास सुरुवात होते. झोप नीट येत नाही. डायबिटीज रुग्णांना ब्लड शुगर लेवल नियंत्रणात ठेवणं गरजेचं आहे. खाण्या-पिण्याकडे लक्ष दिल्यास शुगर नियंत्रणात ठेवली जाऊ शकते.

Nov 14, 2019, 12:39 PM IST
1/9

डाळिंब - डाळिंबमध्ये मोठ्या प्रमाणात अॅन्टीऑक्सिडन्ट असतात. डाळिंब फ्री रेडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानीपासून बचाव करते. डाळिंब शरीरात बॅड कोलेस्ट्रॉलची लेवल कमी करुन डायबिटीज नियंत्रणात ठेवण्यास मदत करते.

2/9

पेरु - पेरुमध्ये फायबर असल्याने डायबिटीजमध्ये होणारी बद्धकोष्टतेची समस्या कमी होते. तसंच यामुळे डायबिटीज टाइप - २चा धोकाही कमी होऊ शकतो. पेरुमध्ये व्हिटॅमिन-ए आणि व्हिटॅमिन-सी मोठ्या प्रमाणात असतं. 

3/9

दही - डायबिटीजच्या रुग्णांसाठी दही फायदेशीर आहे. रोज दही खाल्याने कॉलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसेराइड लेवल नियंत्रणात राहते. दह्यामुळे टाइप-२ शुगरचा धोका कमी होतो.  

4/9

आवळा - आवळ्यामध्ये अॅन्टी डायबिटीक तत्व असतात. यामुळे डायबिटीजविरोधात लढण्यास मदत करतात.

5/9

पपई - पपई डायबिटीजसाठी अतिशय फायदेशीर आहे. पपईत असलेले नॅचरल अॅन्टिऑक्सिडेन्ट्स डायबिटीजसाठी गुणकारी ठरतात. पपई शरीरातील पेशी खराब होण्यापासून प्रतिबंधित करते.

6/9

जांभूळ - डायबिटीजमध्ये जांभूळ अतिशय महत्त्वाचं ठरतं. जांभूळ ग्लुकोजला एनर्जीमध्ये बदलतो. ज्यामुळे शरीरात ग्लुकोज नियंत्रणात राहतं.

7/9

कारलं - कारल्यामध्ये पॉलीपेप्टाइड पी नावाचं प्लांट इन्सुलिन असतं. ते ब्लड-शुगर नियंत्रणात ठेवण्यास मदत करतं. 

8/9

मेथीचे दाणे - मेथी दाणे फायबरयुक्त असतात आणि शरीरात इन्सुलिनचं प्रमाण वाढवण्यासाठी मदत करतात. याशिवाय मेथी दाणे ब्लड शुगर लेवलही कमी करतात.

9/9

बिट - बिट मिनरल आणि व्हिटॅमिनचा स्त्रोत आहे. डायबिटीज असणाऱ्या रुग्णांनी जेवणात बिटाचा जरुर समावेश करावा.