Kojagiri Purnima 2023 : कोजागिरी पौर्णिमेच्या मराठी शुभेच्छा संदेश

Kojagiri Purnima Wishesh in Marathi 2023 : शनिवारी कोजागिरी पौर्णिमा (Sharad Purnima)जगभरात आनंदाने साजरी केली जाईल. या दिवशी आपल्या जवळच्या व्यक्तींना द्या मराठीतून (Kojagiri Pornima Marathi Quotes)शुभेच्छा. 

| Oct 27, 2023, 13:15 PM IST

Kojagiri Pornima Marathi Messages And Quotes : अश्विन पौर्णिमेला शरद पौर्णिमा अथवा कोजागिरी पौर्णिमा असं म्हणतात. या वर्षी 28 ऑक्टोबरला कोजागिरी पौर्णिमा आहे. कोजागिरीच्या रात्री चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो. त्यामुळे चंद्रप्रकाश नेहमीपेक्षा लख्ख आणि जास्त असतो. भारतीय परंपरेत कोजागिरीच्या रात्री माता लक्ष्मी चंद्रावरून पृथ्वीवर येते आणि कोण जागत आहे ते पाहते, अशी आख्यायिका आहे. 

'जागणे' या शब्दाचा अर्थ फक्त जागरण करणे असा नसून सावध आणि दक्ष असणे असा आहे. आयुष्याबाबत सजग आणि जागृत असलेल्या लोकांवर माता लक्ष्मीची कृपा होते अशी मान्यता आहे. यासाठीच कोजागिरीला जागरण करत माता लक्ष्मीची मनोभावे पूजा केली जाते. शिवाय चंद्रप्रकाशाचे प्रतिक म्हणून दूधाचे प्राशन केले जाते. यंदा कोजागिरी पौर्णिमा आणि चंद्रग्रहण एकाच दिवशी आले आहे. 

चंद्रप्रकाशातील दूध कोजागिरीला पिण्यामुळे आरोग्याला चांगला लाभ होतो हेच कोजागिरी पौर्णिमेचे महत्त्व आहे. यावर्षी अशी कोजागिरी पौर्णिमा साजरी करण्यासाठी सर्वांना द्या मराठीतून हार्दिक शुभेच्छा आणि संदेश. (फोटो सौजन्य - iStock)

1/10

कोजागिरी शुभेच्छा 10

 Kojagiri Purnima Wishes, Quotes And Status In Marathi

दूध केशरी, चंद्र – चांदणे,  कोजागिरीचे रूप आगळे…कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!

2/10

कोजागिरी शुभेच्छा 9

 Kojagiri Purnima Wishes, Quotes And Status In Marathi

कोजागिरी पौर्णिमा तुमच्या आयुष्यात सौख्य, मांगल्य, समृद्धी आणि दीर्घायुष्य घेऊन येणारी ठरो! देवी लक्ष्मीचरणी हीच प्रार्थना, कोजागिरी पौर्णिमेच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!

3/10

कोजागिरी शुभेच्छा 8

 Kojagiri Purnima Wishes, Quotes And Status In Marathi

आली कोजागिरी पौर्णिमा, शरदाचे चांदणे घेऊन, कोण कोण जागे हे पाहते लक्ष्मी दाराशी येऊन, कोजागिरी पौर्णिमेच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा!

4/10

कोजागिरी शुभेच्छा 7

 Kojagiri Purnima Wishes, Quotes And Status In Marathi

चांदण्यात न्हावून निघाली चांदरात, कोजागिरीच्या चंद्राचा पसरला रुपेरी प्रकाश…. कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

5/10

कोजागिरी शुभेच्छा 6

 Kojagiri Purnima Wishes, Quotes And Status In Marathi

शरदाचे चांदणे आणि कोजागिरीची रात्र, चंद्राच्या मंद प्रकाशात साजरी करू एकत्र, दूध साखरेचा गोडवा नात्यामध्ये येऊ दे, आनंदाची उधळण आपल्या जीवनी होऊ दे. कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!

6/10

कोजागिरी शुभेच्छा 5

 Kojagiri Purnima Wishes, Quotes And Status In Marathi

मध्यरात्री लक्ष्मी माता चंद्रमंडलातून येते, जो असे जागा त्याच्यावर संतुष्ट होत आर्शीवाद देवूनी जाते. कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

7/10

कोजागिरी शुभेच्छा 4

 Kojagiri Purnima Wishes, Quotes And Status In Marathi

केशरयुक्त दुधाची चवदार साथ, ठेवू दुधाला शीतल चंद्रप्रकाशात, म्हणूया देवीचे श्रीयुक्त महान, दुधाची चव चाखू आपल्या कुटुंबात… कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

8/10

कोजागिरी शुभेच्छा 3

 Kojagiri Purnima Wishes, Quotes And Status In Marathi

साखरेचा गोडवा केशरी दुधात, विरघळला तुझ्या माझ्या नात्यात, रेंगाळत राहो अंतर्मनात, स्नेहभाव वाढत राहो अंतःकरणात… कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

9/10

कोजागिरी शुभेच्छा 2

 Kojagiri Purnima Wishes, Quotes And Status In Marathi

 चंद्राच्या साथीने मिळाली बासुंदीची मेजवानी, कोजागिरीच्या रात्री लिहिली जागरणाची कहाणी…कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!

10/10

कोजागिरी शुभेच्छा संदेश 1

 Kojagiri Purnima Wishes, Quotes And Status In Marathi

मंद प्रकाश चंद्राचा, त्यात गोडवा दुधाचा, विश्वास वाढू दे नात्याचा, त्यात असू दे गोडवा साखरेचा…कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!