कोकणातील 'हा' किनारा गोव्यालाही टाकेल मागे; मुंबईपासून अवघ्या 5 तासांवर...

Konkan Travel Destinations : सहसा समुद्र किनारा म्हटलं की अनेकांना गोवा आठवतो. पण, या गोव्याच्या आधी येणारा कोकण विसरून कसं चालेल? कोकणातील एक सुरेख समुद्रकिनारा सध्या पर्यटकांचं लक्ष वेधतोय.   

Apr 08, 2024, 14:42 PM IST

Konkan Travel Destinations : समुद्रकिनारा प्रत्येकासाठीच खास असतो. मुळात त्या किनाऱ्याशी प्रत्येकाचच खास नातं असतं. हे नातं एका वेगळ्या दृष्टीतून पाहण्यासाठी आणि अनुभवण्यासाठी एक कमाल ठिकाण तुमची वाट पाहतंय. 

1/7

मुंबईपासून पाच साडेपाच तासांच्या अंतरावर

Konkan anjarle beach feels like goa turtle festival details

मुंबईपासून पाच साडेपाच तासांच्या अंतरावर असणाऱ्या या समुद्रकिनाऱ्यानं मागील काही वर्षांमध्ये अनेकांच्याच मनाचा ठाव घेतला. दापोलीमध्ये असणाऱ्या या किनाऱ्याचं नाव आहे, आंजर्ले. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये असणारा हा किनारा म्हणजे खऱ्या अर्थानं रत्नच. 

2/7

आंजर्ले

Konkan anjarle beach feels like goa turtle festival details

स्वच्छ वाळूचा मोठा किनारा, आजुबाजूला हिरवळ, कमालीचा सांस्कृतीक वारसा आणि अथांग समुद्र म्हणजे आंजर्ले. आंजर्लेला येऊन इथं तुम्हाला स्थानिकांचं जीवन जवळून पाहता येतं.   

3/7

आवर्जून पाहावं असं ठिकाण

Konkan anjarle beach feels like goa turtle festival details

आंजर्लेला पाहता येणारं आणि आवर्जून पाहावं असं ठिकाण म्हणजे रिडले बीच. शहरी धकाधकीपासून दूर वाळूतून फक्त आणि फक्त समुद्राच्या लाटांचाच आवाज कानांवर घेत तुम्ही या ठिकाणचं सौंदर्य अनुभवू शकता. 

4/7

कार्ले खिंड

Konkan anjarle beach feels like goa turtle festival details

कार्ले खिंड हे ठिकाण म्हणजे निसर्गप्रेमींसाठी पर्वणी. घनदाट हिरवळीमध्ये असणाऱ्या या ठिकाणावर पठारं आणि खडकांमधून वाट काढत सह्याद्रीचा सुखावह नजारा पाहणं म्हणजे स्वर्गसुख. 

5/7

आंजर्ले कासव महोत्सव

Konkan anjarle beach feels like goa turtle festival details

आंजर्ले कासव महोत्सव हे या ठिकाणचं आणखी एक वैशिष्ट्य. ऑलिव्ह रिडले कासवांच्या जन्मानंतर त्यांचा समुद्रापर्यंत जाण्याचा प्रवास तुम्हाला इथं पाहता आणि अनुभवता येतो. इवलिशी कासवं लाटांच्या पहिल्या स्पर्शानं कशी गडबडतात याचं सुरेख दर्शन या किनाऱ्यावर होतं. 

6/7

कमालीचा माहोल

Konkan anjarle beach feels like goa turtle festival details

कासवांची कमाल पाहण्याशिवाय, इथं असणारं कड्यावरचा गणपती मंदिर पाहताना तुम्हाला प्राचीन स्थापत्यकला जवळून पाहता आणि निरीक्षण करता येते. नारळाच्या बागांनी अच्छादलेल्या सुरेखशा ठिकाणी हे मंदिर उभं आहे. एका खडकात कोरलेल्या गणपतीची मूर्ती पाहताना या मंदिरात भान हरपायला होता.   

7/7

सर्वोत्तम पर्याय

Konkan anjarle beach feels like goa turtle festival details

थोडक्यात आंजर्ले दोन दिवसांच्या सहलीसाठी एक उत्तम ठिकाण. खरंतर इथं राहाल तितकं कमीच आहे. पण, गोव्यापर्यंत पोहोचणं शक्य नसल्यास हे ठिकाण तुमच्यासाठी एक सर्वोत्तम पर्याय ठरेल यात शंका नाही.