वन नाइट स्टॅंडनंतर Krushna Abhishek पडला होता प्रेमात! 12 वर्षांनी मोठ्या कश्मिराशी बांधली लगीनगाठ

Krushna Abhishek : छोट्या पडद्यावरील कॉमिडीनं सगळ्यांना जोरजोरात हसवणारा अभिनेता म्हणजेट सगळ्यांचा लाडका कॉमेडियन अभिनेता कृष्णा अभिषेक आहे. कृष्णा अभिषेक हा बॉलिवूड अभिनेता गोविंदाचा भाचा आहे. कृष्णा नेहमीच काही ना काही कारणामुळे चर्चेत असतो. दरम्यान, कृष्णा आता त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. कृष्णानं कश्मिरा शाहशी लग्नगाठ बांधली.   

| Apr 28, 2023, 19:27 PM IST
1/7

कश्मिराचा धक्कादायक खुलासा

krushna abhishek kashmira shah love story

कृष्णा हा नेहमीच कश्मिरा शाहमुळे चर्चेत राहतो. त्यांचं रिलेशनशिपतर सगळीकडे चर्चेचे कारण ठरले होते. एका मुलाखतीत कश्मिरानं तिच्या आणि कृष्णाच्या नात्याविषयी खुलासा केला होता. त्यांच्या नात्याची सुरुवात ही वन नाइट स्टॅंडनं झाली होती. 

2/7

वन नाईट स्टॅंडनं झाली नात्याला सुरुवात

krushna abhishek kashmira shah love story

कश्मिरानं केलेल्या या खुलाशावर कृष्णानं देखील दुजोरा दिला होता. त्याप्रमाणे त्यांच्या रिलेशनशिपची सुरुवात वन नाईट स्टॅंडनं झाल्याचे स्पष्ट झाले. 

3/7

शूटिंगमध्ये झाली होती भेट

krushna abhishek kashmira shah love story

कश्मिरा आणि कृष्णा या दोघांची भेट ही शूटिंगदरम्यान, झाली होती. याविषयी कृष्णानं सांगितले की कश्मिरानं त्याला अनेकवेळा हिंट दिली. पण एक दिवस आम्ही दोघं कारमध्ये होतो आणि तेव्हाच लाईट गेली. 

4/7

वन नाईट स्टॅंडनंतर काय झालं?

krushna abhishek kashmira shah love story

वन नाईट स्टॅंडनंतर कृष्णा आणि कश्मिरा एकमेकांची खूप काळजी घेऊ लागले होते. तर ते एकमेकांसाठी नेहमीच जेवण घेऊन येऊ लागले होते.

5/7

कश्मिरा होती विवाहीत

krushna abhishek kashmira shah love story

कृष्णा आणि कश्मिराची पहिली भेट ही 'पप्पू पास हो गया' या चित्रपटाच्या सेटवर झाली होती. त्या दोघांना एकमेकांसाठी भावना निर्माण होऊ लागल्या होत्या आणि तेव्हा कश्मिरा ही विवाहीत होती.   

6/7

कश्मिरा आहे 12 वर्षांनी मोठी

krushna abhishek kashmira shah love story

जेव्हा कृष्णाला कळलं की कश्मिरा तिच्यापतीपासून विभक्त होत आहे, तेव्हा कृष्णाला आता आपल्यात काही होऊ शकतं अशी आशा निर्माण झाली. तर कश्मिरा ही कृष्णा पेक्षा वयानं 12 वर्षांनी मोठी आहे.   

7/7

या वर्षी अडकले लग्न बंधनात

krushna abhishek kashmira shah love story

कश्मिरा आणि कृष्णा हे 2013 साली लग्न बंधनात अडकले तर त्यांना जुळी मुलं देखील आहेत. सरोगसीच्या माध्यामातून त्यांनी मुलांना जन्म दिला. (All Photo Credit : krushna abhishek/kashmira shah Instagram)