'कुछ कुछ होता है' सिनेमाला २० वर्ष पूर्ण | या सिनेमा मागची ८ गुपितं
कुछ कुछ होता है...या नव्वदच्या दशकात आलेला सिनेमा खूप लोकप्रिय झाला होता, कुछ कुछ होता है सिनेमाला आज २० वर्ष पूर्ण झाली.
कुछ कुछ होता है...या नव्वदच्या दशकात आलेला सिनेमा खूप लोकप्रिय झाला होता, कुछ कुछ होता है सिनेमाला आज २० वर्ष पूर्ण झाली.
हा सिनेमा १९९८ साली प्रदर्शित झाला. हा सिनेमा प्रचंड़ हिट झाला, हे एक मोठं यश होतं. ही एक प्रेम कहाणी आहे, शाहरूख आणि काजोलच्या अभिनयाने या सिनेमात रंग भरलेले आहेत. मैत्री आणि प्रेमाचं हे एक कॉम्बिनेशन सर्वांना भावलं, यात 'प्यार दोस्ती है' ही प्रेमाची कल्पना खूपच हीट झाली.
या सिनेमाचं कथानक करन जोहरने लिहिलं आणि दिग्दर्शित केलं. या सिनेमात पडद्यावर राणी मुखर्जी (सिनेमातील टीना), शाहरूख खान (सिनेमातील राहुल) आणि काजोल (सिनेमातील अंजली) यांचं एक अनोखं आणि सर्वांना भावणारं त्रिकुट एकत्र होतं. या सिनेमात काम करणाऱ्या सर्वांसाठीच ही भूमिका त्यांचं करिअर एक नव्या उंचीवर नेणारं ठरलं.
हा तीन जणांच्या प्रेमाच्या त्रिकोणात सर्व काही रोमान्स, प्रेम, दु:ख आणि प्रेमाची भावना, त्या वेळी युवक आणि युवतींना हा सिनेमा डोक्यावर घेतला होता, शाहरूख आणि काजोलसोबत राणी मुखर्जीची लोकप्रियता येथूनच मोठ्या प्रमाणात वाढत गेली.