कूनोतून Good News! नामिबियाहून आलेल्या 'ज्वाला'ने दिला 3 बछड्यांना जन्म

कुनो नॅशनल पार्कमध्ये ज्वाला या चित्ता मादीने तीन बछड्यांना जन्म दिला आहे.

Jan 23, 2024, 16:17 PM IST
1/7

काही दिवसांपुर्वी दक्षिण आफ्रिकेतून आणलेल्या चित्तांच्या मृत्यूमुळे चिंता व्यक्त केली होत होती. 16 जानेवारीला शौर्य नावाच्या चित्त्याचे निधन झाले होते.   

2/7

मात्र, आता ज्वाला या चित्ता मादीने तीन बछड्यांना जन्म दिला आहे, त्यामुळे आनंदाचं वातावरण पसरलं आहे. कुनो नॅशनल पार्कमध्ये मंगळवारी तीन चित्त्याची बछडे जन्माला आले. मादी चित्ता ज्वालाने तीन बछड्यांना जन्म दिला आहे.

3/7

 तिन्ही बछडे पूर्णपणे निरोगी आहेत. यापूर्वी मार्च २०२३ मध्ये ज्वाला चित्ताने चार बछड्यांना जन्म दिला होता. यातील तीन बछड्यांचा मृत्यू झाला आहे.

4/7

कुनो नॅशनल पार्कमध्ये मंगळवारी चित्त्याच्या बछड्यांचा जन्म झाल्यानंतर चित्यांची संख्या 17 झाली आहे. त्यात सात बछड्यांचा समावेश आहे.   

5/7

कुनो व्यवस्थापनाने अति उष्णतेमुळे बछड्यांचा मृत्यू झाला होता असे सांगितले होते. ही मादी चित्ता आधी सिया या नावाने ओळखली जात होती, नंतर तिचे नाव ज्वाला ठेवण्यात आले. ज्वालालाही नामिबियातून कुनो नॅशनल पार्कमध्ये आणण्यात आले आहे.

6/7

बऱ्याच दिवसांनी कुनो नॅशनल पार्कमधून एक चांगली बातमी समोर आली आहे बछड्यांना एका मोठ्या बंदोबस्तात ठेवण्यात आले असून, तेथे डॉक्टर त्यांच्यावर देखरेख ठेवत आहेत. अशी माहिती केंद्रिय मंत्री भूपेंद्र यादव यांनी स्वतः ही माहिती दिली आहे.  

7/7

त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म (X) वर पोस्ट केले - 'जंगलात पिलांचा आवाज झाला. कुनो नॅशनल पार्क तीन नवीन सदस्यांचे स्वागत करत आहे हे सांगताना आनंद होत आहे. नामिबियातून आणलेल्या ज्वाला या मादी चित्ताने या ३ पिल्लांना जन्म दिला आहे. केंद्रिय मंत्री भूपेंद्र यादव यांनी पुढे लिहिले - कुनो राष्ट्रीय उद्यानाचे अधिकारी, सर्व तज्ञ, आणि संपूर्ण देशातील वन्यजीव प्रेमींना माझ्या शुभेच्छा.