PHOTO : 3 मुलांच्या वडिलांवर फिदा झाली लेडी सुपरस्टार, पत्नीने दिली धमकी, 'ती मला पुन्हा...'

शाहरुख खानसोबतच्या त्या चित्रपटानंतर अभिनेत्रीची ओळख लेडी सुपरस्टार म्हणून झाली. ही अभिनेत्री एकेकाळी 3 मुलांच्या वडिलांच्या प्रेमात पडली होती. तो व्यक्ती प्रसिद्ध अभिनेतासोबतच कोरियोग्राफर आहे. 

Dec 12, 2023, 22:17 PM IST

Entertainment : शाहरुख खानसोबतच्या त्या चित्रपटानंतर अभिनेत्रीची ओळख लेडी सुपरस्टार म्हणून झाली. ही अभिनेत्री एकेकाळी 3 मुलांच्या वडिलांच्या प्रेमात पडली होती. तो व्यक्ती प्रसिद्ध अभिनेतासोबतच कोरियोग्राफर आहे. 

1/7

बॉलिवूडमध्ये श्रीदेवीनंतर तामिळ चित्रपटातील या अभिनेत्रीला तिच्या अभिनयामुळे लेडी सुपरस्टारचा टॅग मिळाल आहे. मल्याळम चित्रपटांमधून करिअरची सुरुवात करणारी ही अभिनेत्री एकेकाळी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे खूप चर्चेत आली होती.   

2/7

आम्ही बोलत आहोत शाहरुख खानसोबत जवान या चित्रपटात झळकलेली अभिनेत्री नयनताराबद्दल बोलतोय. तुमच्या विश्वास बसणार नाही पण नयनतारा आणि प्रभुदेवा हे एकमेकांच्या प्रेमात वेड होते.   

3/7

2009 मध्ये प्रभुदेवा दिग्दर्शित 'विल्लू' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यात नयनतारा मुख्य भूमिकेत होती. त्यावेळी त्यांच्या डेटिंगच्या बातम्या वाऱ्यासारखी पसरली होती.

4/7

अनेकांना ही अफवा वाटली कारण प्रभुदेवाची प्रतिमा खूप चांगली होती. तो विवाहित होता आणि तीन मुलांचा बाप होता. त्यामुळे अभिनेत्रीसोबत एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर यावर विश्वास ठेवणं कठीण होतं.   

5/7

टाइम्स ऑफ इंडियाच्या एका जुन्या वृत्तानुसार, प्रभुदेवाने स्वत: या प्रेमाची कबुली दिली होती. एवढंच नाही तर त्याने लग्न करण्याची इच्छाही व्यक्त केली होती. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल या नात्यामुळे प्रभुदेवाने त्याचा पत्नीला घटस्फोट दिला होता. मुलांचा ताबा कोर्टाने आईकडे दिला होता.   

6/7

प्रभुदेवाची पत्नी रामलताला यांच्या नात्यातील कटुता अनेकदा दिसून आली. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, प्रभुदेवाने केलेला विश्वासघात आणि नयनताराबद्दल बोलताना तिने एकदा म्हटलं की, 'जर ती अभिनेत्री कधी माझ्या समोर आली तर ती तिला लाथ मारेल.'   

7/7

पहिल्या पत्नीपासून विभक्त झाल्यानंतर प्रभुदेवा आणि नयनतारा लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. मात्र त्यांचं नात लग्नापर्यंत पोहोचलं नाही. त्या ब्रेकअपनंतर नयनताराने दिग्दर्शक विग्नेश शिवन लग्न केलं आहे. त्यांना दोन मुलं आहेत.