मुंकेश अंबानी यांचं अ‍ॅन्टिलियादेखील आहे 'या' पॅलेससमोर छोटं! भारतातील सगळ्यात मोठं घर कुठे माहितीये?

भारतात आणि आशियात सगळ्यात श्रीमंत लोकांच्या यादीत मुकेश अंबानी यांचं अ‍ॅन्टिलिया हे घर आहे. अ‍ॅन्टिलियाला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. 27 मजल्याच्या या इमारतीला भारतातील सगळ्यात महागड्या घरांमध्ये मोजण्यात येतं. आज आम्ही तुम्हाला अशा एका घरा विषयी सांगणार आहोत जे फक्त भारतात नाही तर संपूर्ण जगात मोठं आहे. 

| Aug 25, 2024, 18:38 PM IST
1/7

गुजरातच्या वडोदरमध्ये असलेलं लक्ष्मी विलास पॅलेस जगातील सगळ्यात मोठं घरं आहे. गायकवाड राजपरिवारानं हे बनवलं होतं. 

2/7

या घराचं खूप सुंदर असं आर्किटेक्चर असून याला ऐतिहासिक वारशाचा उत्कृष्ट नमुना आहे.

3/7

गुजरातचे महाराज सयाजीराव गायकवाडनं त्याला 1880 मध्ये बनवलं होतं. वेगवेगळ्या रंगाचे मार्बल, सुंदर कलाकृतीनं लक्ष्मी विलास पॅलेस ब्रिटिश राजशाहीचं लंडन स्थित अधिकारिक निवास बकिंघम पॅलेसच्या तुलनेत चारपट मोठं आहे. 

4/7

एका रिपोर्टनुसार, सध्या या आलीशान पॅलेसची किंमत जवळपास 1.80 लाख पाउंड म्हणजेच 20 हजार कोटी आहे. या घरात सध्या HRH समरजीतसिंह गायकवाड आणि त्यांची पत्नी राधिकाराजे गायकवाड आणि त्यांच्या दोन मुली राहतात. 

5/7

वडोदराच्या तत्कालीन महाराज गायकवाड III नं आर्किटेक्टर रॉबर्ड फेलोज चिसोल्मच्या मदतीनं या राजशाली पॅलेसला बनवण्यात आला आहे. 18 व्या शतकात बनवण्यात आलेलं हे लग्झरी घर असून इथे कधीच लाईट जात नाही. 

6/7

जवळपास 700 एकरमध्ये पसरलेल्या या लक्ष्मी विलास पॅलेसमध्ये 170 रूम्स आहे. हा पॅलेस 4 मजली आहे. वडोदराचे महाराज आणि महाराणीसाठी हा पॅलेस तयार करण्यात आलं होतं. 

7/7

या घरात सर्वसामान्य लोक देखील जाऊ शकतात. त्यासाठी तुम्हाला 150 रुपयांचा तिकिट काढावं लागेल. जर म्यूजियममध्ये फिरायचं असेल तर तुम्हाला 60 रुपये लागतील.