Lata Mangeshkar : लता दीदींच्या आठवणीत भावूक झाला सचिन तेंडुलकर!

लता मंगेशकर आणि भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्यात एक खास नातं होतं. लता मंगेशकर यांच्या पहिल्या स्मृतीदिनी सचिनला लता दीदींची आठवण आली आहे.

Feb 06, 2023, 21:15 PM IST
1/5

भारतरत्न आणि भारताच्या गानकोकिळा म्हणून प्रसिद्ध असलेल्या लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचं आज 6 फेब्रुवारी 2023 पहिला स्मृतीदिन...त्यांनी वयाच्या 92 व्या वर्षी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.

2/5

लता मंगेशकर यांचा फोटो ट्विटरवर शेअर करत महान फलंदाज सचिन तेंडुलकरने तिच्या 'मेरा साया साथ होगा' गाण्याचे बोल लिहिलेत. त्यासोबत त्याने लिहिलंय की, 'लता दीदींना जाऊन एक वर्ष झाले, पण तुझी सावली कायम सोबत राहील.'

3/5

सचिन तेंडुलकर आणि लता मंगेशकर यांच्यात खूप जवळचं नातं होतं. हे दोघेही एकमेकांचा खूप आदर करत असे.

4/5

2010 मध्ये लता मंगेशकर यांनी सचिन तेंडुलकरला भारतरत्न देण्यात यावं असं म्हटलं होतं.

5/5

लता मंगेशकर यांच्या निधनावर सचिनने एका भावनिक पोस्ट लिहिली होती, ''मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की, मी लता दीदींच्या आयुष्याचा एक भाग होतो. त्यांनी मला नेहमी प्रेम आणि आशीर्वाद दिले. त्यांच्या जाण्याने एक भाग हरपलाय."