Parenting: अनेकदा मुलांसाठी 'लेझी पॅरेंटिंग' ठरते फायदेशीर, कशी? ते जाणून घ्या

Lazy Parenting: लेझी पॅरेंटींगमुळे मुलांना कोणत्याही कामात पुढाकार घेण्याचा आत्मविश्वास मिळतो. 

| Dec 10, 2023, 13:30 PM IST

Lazy Parenting: लेझी पॅरेंटिंगमध्ये आई-वडिल मुलांच्या प्रत्येक गोष्टीत हस्तक्षेप करत नाहीत. ते मुलांना प्रत्येकवेळी टोकत नाहीत. 

1/9

Parenting: अनेकदा मुलांसाठी 'लेझी पॅरेंटिंग' ठरते फायदेशीर, कशी? ते जाणून घ्या

Lazy Parenting Benifits Children Do Own Work Marathi News

Lazy Parenting: आजकाल लोक पॅरेंटिंग विषय खूप गांभीर्याने घेतात. बाळ जन्माला आल्यापासून 6 महिन्याचा होईपर्यंत ते अगदी शाळेत जाईपर्यंत प्रत्येक गोष्टीची काळजी घेतली जाते. मुलं जसजशी मोठी होतात तसे पालक त्यांना लहान-मोठ्या गोष्टी शिकवतात, समजावतात,शाळेत घडणाऱ्या गोष्टींवर लक्ष ठेवतात. पण अनेकदा मुलांसाठी काहीच न करणंदेखील फायदेशीर असतं. याला लेझी पॅरेंटिंग असं म्हणतात. 

2/9

हस्तक्षेप नाही

Lazy Parenting Benifits Children Do Own Work Marathi News

जे पालक मुलांच्या कामात हस्तक्षेप करत नाहीत, ते मुलांसाठी काहीच करत नाहीत, असा लेझी पॅरेंटिंगचा अर्थ होत नाही. फरक फक्त इतकाच आहे की ते मुलांच्या प्रत्येक गोष्टीत हस्तक्षेप नाही करत.

3/9

काय आहे लेझी पॅरेंटिंग?

Lazy Parenting Benifits Children Do Own Work Marathi News

लेझी पॅरेंटिंगमध्ये आई-वडिल मुलांच्या प्रत्येक गोष्टीत हस्तक्षेप करत नाहीत. ते मुलांना प्रत्येकवेळी टोकत नाहीत. मुलांना प्रत्येक काम स्वत:हून करण्यास प्रोत्साहित करतात. यात मुले चुका करतात आणि त्यातून शिकतात. यामुळे बऱ्याचदा मुले स्वत:हून निर्णय घेण्यास सक्षम बनतात. 

4/9

लेझी पॅरेंटींगचे फायदे

Lazy Parenting Benifits Children Do Own Work Marathi News

लेझी पॅरेंटींगमुळे मुलांना कोणत्याही कामात पुढाकार घेण्याचा आत्मविश्वास मिळतो. 

5/9

अवलंबत्व कमी

Lazy Parenting Benifits Children Do Own Work Marathi News

मुलांच्या रोजच्या कामात कोणी हस्तक्षेप करत नाही. त्यामुळे दुसऱ्यावर अवलंबून राहत नाहीत. 

6/9

चुका सुधारण्याची मुभा

Lazy Parenting Benifits Children Do Own Work Marathi News

लेझी पॅरेंटिंगमध्ये पालक मुलांना चुका करण्याची आणि त्या सुधारण्याची मुभा देतात. मुले स्वत:ला नुकसान पोहोचवणार नाहीत, याची काळजी घेतली जाते. 

7/9

नैसर्गिक प्रक्रिया

Lazy Parenting Benifits Children Do Own Work Marathi News

अशावेळी मुले एखादे काम एकट्याने पूर्ण करु शकत नाहीत. अनेकदा त्यांना कामासाठी जास्त वेळ लागतो. काम करताना ते धडपडतातही, त्यांना इजाही होते. पण ही शिकण्याची एक नैसर्गिक प्रक्रिया आहे जी मुलांना मजबूत बनवते.

8/9

आदेशाचा दबाव

Lazy Parenting Benifits Children Do Own Work Marathi News

लेझी पॅरेंटींगमुळे मुलांना प्रत्येकवेळी पालकांकडून आदेश घेणे आणि त्याचे पालन करण्याचा दबाव राहत नाही. त्यामुळे मुले मेंटल फ्री राहतात. 

9/9

पूर्ण लक्ष कामावर

Lazy Parenting Benifits Children Do Own Work Marathi News

मुलांच्या चुका सुधारण्यासाठी प्रत्येकवेळी त्यांचे पालक मागे लागत नाहीत. यामुळे मुलांचा बौद्धीक विकास वेगाने होतो. कारण त्यांचे पूर्ण लक्ष काम चांगल्याप्रकारे करण्यावर असते.