हादरवणारे PHOTOS; वाळवंटातील महापुरात नदीचं अस्तित्वं नष्ट, सर्वत्र मृतदेहांचा खच

Libya Flood : अतिशय भयावह अशी परिस्थिती लिबियामध्ये पाहायला मिळत असून, वाळवंटीय देशात आलेल्या या पुरानं सर्वकाही उध्वस्त केलं आहे. 

Sep 13, 2023, 14:00 PM IST

Libya Flood : लिबियातील पुर्वेकडे पुरानं थैमान घातलं असून, या पुरामध्ये आतापर्यंत अनेकांनाच प्राण गमवावा लागला आहे. मागील 24 तासांत लिबियातील डरना शहरामध्ये 1500 हून अधिक मृतदेह हाती लागले आहेत. 

1/8

हादरवणारे PHOTOS

Libya Flood storm devastating photos

हादरवणारे PHOTOS; वाळवंटातील महापुरात नदीचं अस्तित्वं नष्ट, सर्वत्र मृतदेहांचा खच  (छाया सौजन्य- रॉयटर्स)

2/8

लिबियामध्ये पूर

Libya Flood storm devastating photos

डॅनियल या चक्रिवादळामुळं लिबियामध्ये हा पूर आला. ज्यानंतर पुराच्या पाण्यानं शहरातील अनेक बांध फोडले आणि पाण्याचा शहरात शिरकाव झाला. (छाया सौजन्य- एपी)

3/8

पाण्याचे लोट

Libya Flood storm devastating photos

अतिप्रचंड वेगानं पाण्याचे लोट वाहत आले आणि पाहता पाहता त्यानं शहरंच्या शहरं गिळंकृत केली. (छाया सौजन्य- एपी)

4/8

लिबियाचं मोठं नुकसान

Libya Flood storm devastating photos

भूमध्य समुद्रात आलेल्या या पूरानं लिबियाचं मोठं नुकसान झालं असून, पुरानं प्रभावित भागाची छायाचित्र हादरा देणारी आहेत.  (छाया सौजन्य- रॉयटर्स)

5/8

नुकसानाचा आकडा

Libya Flood storm devastating photos

लिबियामध्ये नागरी व्यवस्थापनावर गांभीर्यानं लक्ष देण्यात आलं नसल्यामुळं आता नुकसानाचा आकडा वाढतानाच दिसत आहे. या परिस्थिती शेजारी राष्ट्रांनी मदतीचा हात पुढे केला आहे. (छाया सौजन्य- एपी)

6/8

शहराचा सखल भाग नामशेष

Libya Flood storm devastating photos

पुरामुळं डरना शहराचा सखल भाग नामशेष झाला आहे. तर, इमारतीही चिखलाखाली गेल्या आहेत. इतकंच नव्हे इथं नदीचा प्रवाहसुद्धा नाहीसा झाला आहे. (छाया सौजन्य- रॉयटर्स)

7/8

नदीची पाणीपातळी वाढली

Libya Flood storm devastating photos

सुरुवातीला लिबियातील नदीची पाणीपातळी वाढली, किनाऱ्यावरील इमारतींना सोबत घेऊन हा प्रवाग पुढे आला आणि इमारतींच्याच ढिगाऱ्यामध्ये हा प्रवाहही नष्ट झाला.  (छाया सौजन्य- रॉयटर्स)

8/8

डॅनिअल वादळाची पूर्वसूचना

Libya Flood storm devastating photos

स्थानिक प्रशासनाच्या माहितीनुसार डॅनिअल वादळाची माहिती जवळपास 72 तासांपूर्वीच देण्यात आली होती. किंबहुना नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याच्या सूचनाही करण्यात आल्या होत्या. पण, या सूचनेकडे दुर्लक्ष करण्य़ात आल्यामुळं हे संकट ओढावलं. (छाया सौजन्य- रॉयटर्स)