Lionel Messi ला मोठा धक्का; फुटबॉल क्लब PSG ने घातली बंदी

पॅरिस सेंट जर्मन (PSG) ने लिओनेलवर मोठी कारवाई केली आहे. मेस्सीवर 2 आठवड्यांसाठी खेळण्याची बंदी घालण्यात आलीये. 

| May 03, 2023, 21:47 PM IST
1/7

लिओनेल मेस्सीच्या चाहत्यांसाठी एक फार वाईट बातमी आहे. पॅरिस सेंट जर्मन (PSG) ने मेस्सीवर खेळण्याची बंदी आणली आहे. 

2/7

PSG ने मेस्सीवर 2 आठवड्यांसाठी ही बंदी घातली असल्याची माहिती आहे. 

3/7

मिळालेल्या माहितीनुसार, मेस्सी आता दोन आठवडे त्याच्या क्लबसोबत एकंही सामना खेळू शकत नाही. यासोबतच त्याच्या ट्रेनिंगवरही बंदी घालण्यात आली आहे.

4/7

यासोबतच मेस्सीचे 2 आठवड्यांचा पगार देखील कापला जाणार आहे. 

5/7

PSG क्लबने शेवटचा सामना 30 एप्रिल रोजी लॉरिएंट विरुद्ध खेळला. त्या सामन्यात पीएसजीला 3-1 अशा पराभवाचा सामना करावा लागला होता.

6/7

टीमने दिलेल्या नियमांनुसार, PSG ने तो सामना जिंकला असता तर खेळाडूंना 2 दिवसांची सुट्टी मिळाली असती. परंतु हा सामना गमावल्यामुळे सुट्टी कॅन्सल करण्यात आली होती.

7/7

नियमांनुसार, अशा परिस्थितीत मेस्सीने टीमसोबत ट्रेनिंग घ्यायला हवी होती. मात्र तो कुटुंबासोबत सौदी अरेबियाला गेला. यामुळे त्याच्यावर बंदी घालण्यात आली आहे.