प्रितीचे धागे जुळले! 'लिटील चॅम्प्स' फेम मुग्धा वैशंपायन- प्रथमेश लघाटे म्हणतात 'आमचं ठरलंय'

Sa Re Ga Ma Pa Marathi L'il Champs : कोणी भारुडं म्हणत, कोणी भक्तिगीतं म्हणत तर कोणी भावगीतं म्हणत फक्त कार्यक्रमाच्या परीक्षकांनाच नव्हे तर राज्याच्या कानाकोपऱ्यातील प्रेक्षकांच्या मनातही कायमचं घर केलं. 

Jun 16, 2023, 09:10 AM IST

prathamesh laghate and mugdha vaishampayan :  सा रे ग म प लिटील चॅम्प्स (Sa Re Ga Ma Pa Marathi L'il Champs) या रिअॅलिटी शोचं पहिलं पर्व प्रेक्षकांच्या भेटीला आलं आणि संपूर्ण महाराष्ट्राला या लहानग्या गायकांनी वेड लावलं. 

1/8

लोकप्रियता कायम

little champs fame prathamesh laghate and mugdha vaishampayan in a relationship photo viral

आज या कार्यक्रमाला इतकी वर्षे उलटूनही या लिटील चॅम्प्सची लोकप्रियता कमी झालेली नाही. तोच मोदक, मॉनिटर जेव्हाजेव्हा समोर येतात तेव्हातेव्हा सर्वांनाच जुने दिवस आठवतात.   

2/8

लिटिल चॅम्प्स मोठे झालेयत.

little champs fame prathamesh laghate and mugdha vaishampayan in a relationship photo viral

बरं, आता हे लिटिल चॅम्प्स मोठे झालेयत. त्यातल्या काहींनी तर लग्नही केलीयत. कार्तिकी गायकवाडनं काही वर्षांपूर्वी लग्नगाठ बांधली तर, रोहित राऊतही मागच्या वर्षी विवाहबंधनात अडकला. 

3/8

एकमेकांची साथ

little champs fame prathamesh laghate and mugdha vaishampayan in a relationship photo viral

सोशल मीडियावर सक्रिय असणारी याच लिटील चॅम्प्समधील एक जोडी आता प्रत्यक्ष आयुष्यातही एकमेकांची साथ देणार आहे. 

4/8

प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन

little champs fame prathamesh laghate and mugdha vaishampayan in a relationship photo viral

ही जोडी म्हणजे प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायनची. मुग्धा आणि प्रथमेश सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असून, विविध ठिकाणी ते दोघंही एकत्र कार्यक्रमही करतात. 

5/8

पहिली भेट

little champs fame prathamesh laghate and mugdha vaishampayan in a relationship photo viral

एका रिअॅलिटी शोमुळं झालेली त्यांची पहिली भेट, त्यानंतर इतकी वर्षे एकमेकांसोबतची ओळख आणि प्रत्यक्ष आयुष्यात कामाच्या निमित्तानं मिळणारी एकमेकांची साथ. 

6/8

नातं बहरलं

little champs fame prathamesh laghate and mugdha vaishampayan in a relationship photo viral

अगदी टप्प्याटप्प्यानं मुग्धा आणि प्रथमेशचं नातं बहरलं आणि सूर छेडताना त्याच्या प्रितीचेही धागे जुळले असंच म्हणावं लागेल. 

7/8

'आमचं ठरलंय'

little champs fame prathamesh laghate and mugdha vaishampayan in a relationship photo viral

कारण, सोशल मीडियावर 'आमचं ठरलंय' असं म्हणत आता या जोडीनं त्यांच्या नात्याची ग्वाही दिलीये. नात्याच्या अधिकृत घोषणेची वाट पाहणाऱ्या प्रत्येकासाठीच मुग्धा आणि प्रथमेशनं सुरेखसा फोटो शेअर करत #ModakGotMonitor अशा हॅशटॅगनं एक फोटो पोस्ट केला आहे. 

8/8

फोटो क्षणात व्हायरल

little champs fame prathamesh laghate and mugdha vaishampayan in a relationship photo viral

सोशल मीडियावर त्यांचा हा फोटो पोस्ट होताच क्षणात व्हायरल झाला आणि बस्स, मग काय? कमेंट बॉक्समध्ये सेलिब्रिटी, मित्रमंडळी आणि चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरु केला.