जयाप्रदा यांनी वाढदिवशी भरला उमेदवारी अर्ज

| Apr 03, 2019, 19:11 PM IST
1/5

उमेदवारी अर्ज भरण्याआधी जयाप्रदा यांनी भमरौआ मंदिरात दर्शन घेतलं. विजयासाठी त्यांनी प्रार्थना केली. केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवी हे देखील यावेळी त्यांच्यासोबत उपस्थित होते.

2/5

भगवान शंकराचे दर्शन घेत जयाप्रदा यांनी हजरत रहमान अलाउद्दीन चिश्ती यांच्या चौथऱ्यांचं दर्शन घेतलं. जन्मदिवशी त्यांनी मिठाई देखील वाटली.

3/5

विकास आणि सुरक्षा निवडणुकीचा मुद्दा

विकास आणि सुरक्षा निवडणुकीचा मुद्दा

रामपूर येथून भाजप उमेदवार असलेल्या जयाप्रदा यांनी विकास, संरक्षण आणि महिलांचा सन्मान हे मुद्दे घेतले आहेत.मोदीेचं काम घेऊन जनतेकडे जाऊ असं देखील त्यांनी म्हटलं आहे.

4/5

मार्ग कठीण आहे पण अशक्य नाही

मार्ग कठीण आहे पण अशक्य नाही

जयाप्रदा यांनी म्हटलं की, 'रामपूरची जनता त्यांच्यावर प्रेम करते. त्यामुळेच मी सक्रिय राजकारणात आली आहे. हे समीकरण थोडं कठीण आहे. पण पक्ष आणि जनता सोबत असेल तर विजय निश्चित आहे.'

5/5

५७ वर्षाच्या झाल्या जयाप्रदा

५७ वर्षाच्या झाल्या जयाप्रदा

जयप्रदा यांचा ३ एप्रिलला वाढदिवस असतो.१९६२ मध्ये आंध्र प्रदेशमध्ये त्यांचा जन्म झाला. जयाप्रदा यांनी २०० हून अधिक सिनेमांमध्ये काम केलं आहे. त्यांच्या करिअरची सुरुवात तेलगू सिनेमा`भूमिकोसम`मधून झाली. उत्तर प्रदेशच्या राजकारणात समाजवादी पक्षातून त्यांनी रामपूर लोकसभा मतदारसघांतून पहिल्यांदा निवडणूक लढवली होती.