लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त त्यांचे प्रेरणादायी विचार, मुलांवर करतील सकारात्मक संस्कार

Lokmanya Tilak Punyatithi : दरवर्षी 1 ऑगस्टला बाळ गंगाधर टिळक अर्थात लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी साजरी केली जाते. 1 ऑगस्ट 1920 साली त्यांचे निधन झाले होते. टिळक हे भारतीय स्वातंत्र्यसेनानी, शिक्षक, संपादक आणि लेखक होते.

| Aug 01, 2024, 09:08 AM IST

'स्वराज्य हा माझा जन्म सिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच' असे ब्रीद वाक्य आपल्या सर्वांच्या मनावर कोरले आहे. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची आज पुण्यतिथी. टिळकांनी आपल्या चळवळीतून इंग्रजांना सळो की, पळो करुन सोडले होते. टिळकांनी अनेक सामाजिक कार्यांसोबतच गणोशोत्सवाला सुरुवात केली. तसेच विविध हिंदू संस्कृती आणि परंपरेच त्यांनी जतन केले. जाणून घेऊया त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त जीवनाला प्रेरणा देणारे विचार.

1/10

 स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच – लोकमान्य बाळ गंगाधर टिळक 

2/10

महान गोष्टी सहज मिळत नाहीत आणि सहज मिळणाऱ्या गोष्टी महान नसतात – लोकमान्य टिळक 

3/10

कार्यात यश मिळो ना मिळो प्रयत्नात कधी माघार घेता कामा नये – बाळ गंगाधर टिळक 

4/10

माणूस स्वभावानं कितीही चांगला असला तरी शिक्षणाने त्याचा विकास झाल्याशिवाय देशाची उन्नती होऊ शकत नाही.  

5/10

एका चांगल्या वृत्तपत्राचे शब्दच आपोआप बोलत असतात – लोकमान्य टिळक 

6/10

जेथे बुद्धीचे क्षेत्र संपते तेथे श्रद्धेचे क्षेत्र सुरू होते – बाळ गंगाधर टिळक 

7/10

भारताचे तोपर्यंत रक्त वाहल्या जात आहेत जोपर्यंत लोकांचे सापळे उरत नाहीत 

8/10

मानवाचा स्वभाव हा विना उत्सवाचा राहू शकत नाही म्हणून आपल्यासाठी उत्सव असणे गरजेचे आहे – लोकमान्य टिळक 

9/10

एक जुनी म्हण आहे की, जे स्वतःला मदत करतात, त्यांना देव मदत करतो – लोकमान्य टिळक  

10/10

 ‘मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी टरफले उचलणार नाही’ – लोकमान्य बाळ गंगाधर टिळक