Loksabha Elections 2024 : महाराष्ट्रात एप्रिल, मे महिन्यात पंतप्रधान मोदींच्या सभांचा धडाका; 'हे' नेतेही वेधणार लक्ष

Loksabha Elections 2024 PM Modi Visit To Maharashtra : महाराष्ट्रातील विजय देशातील सत्ताधाऱ्यांसाठी महत्त्वाची बाब असून, सध्या त्याच दृष्टीनं कैक प्रयत्न केले जात आहेत.     

Apr 01, 2024, 11:05 AM IST

Loksabha Elections 2024 PM Modi Visit To Maharashtra : आगामी लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीस महाराष्ट्रात सुरुवात झाली असून अनेक राजकीय घडामोडी सध्या पाहायला मिळत आहेत. 

1/7

Loksabha Elections 2024

loksabha elections 2024 Pm Modi to visit maharashtra amid elections latest updates

Loksabha Elections 2024 PM Modi Visit To Maharashtra : पुन्हा एकदा जागतिक पटलावर लोकशाही राष्ट्र अशी ओळख असणाऱ्या महाराष्ट्रात या लोकशाहीचा जागर पाहायला मिळत आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचं वर्ष म्हणून 2024 या वर्षाकडे देशातील जनता आणि नेतेमंडळी मोठ्या महत्त्वाकांक्षेनं पाहत आहेत.   

2/7

आर्थिक राजधानी

loksabha elections 2024 Pm Modi to visit maharashtra amid elections latest updates

अशा या महाराष्ट्राचं देशाच्या राजकारणात अतीव महत्त्वाचं स्थान आहे. देशाची आर्थिक राजधानी स्थिरावलेल्या याच महाराष्ट्रात खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदीसुद्धा लक्ष देताना दिसत आहेत.   

3/7

निवडणुकीचं वर्ष

loksabha elections 2024 Pm Modi to visit maharashtra amid elections latest updates

लोकसभा निवडणुकीचं वर्ष सुरु झाल्यापासूनच पंतप्रधानांनी राज्यातील काही महत्त्वपूर्ण प्रकल्पांचं लोकार्पण केलं, तर कैक ठिकाणी सभांना हजेरी लावली.   

4/7

पंतप्रधान मोदी महाराष्ट्रात हजेरी लावताना दिसणार

loksabha elections 2024 Pm Modi to visit maharashtra amid elections latest updates

येत्या काळातही निवडणुकांच्या रणधुमाळीत सातत्यानं पंतप्रधान मोदी महाराष्ट्रात हजेरी लावताना दिसणार आहेत. उपलब्ध माहितीनुसार एप्रिल आणि मे महिन्यात राज्यात पंतप्रधान मोदींच्या सभांचा धडाका पाहायला मिळणार आहे.   

5/7

राज्यात मोदींच्या 10 सभा

loksabha elections 2024 Pm Modi to visit maharashtra amid elections latest updates

एप्रिल आणि मे महिन्यात राज्यात मोदींच्या 10 सभा होणार आहेत. महाराष्ट्रात महायुतीच्या प्रचारासाठी मोदींच्या सभेचा धडाका लावला जाणार आहे.  

6/7

10 सभांचं नियोजन

loksabha elections 2024 Pm Modi to visit maharashtra amid elections latest updates

निवडणुकीसाठीच्या प्रचारासाठी जवळपास 10 सभांचं नियोजन राज्यभरात करण्यात येणार आहे. लवकरच या सभांच्या तारखा जाहीर होणार असून, या सभा कुठे घेतल्या जाणार आहेत तेसुद्धा कळणार आहे.  

7/7

फक्त पंतप्रधान मोदीच नव्हे...

loksabha elections 2024 Pm Modi to visit maharashtra amid elections latest updates

फक्त पंतप्रधान मोदीच नव्हे, तर राज्यात अमित शाह, योगी आदित्यनाथ यांच्याही सभा होणार आहेत. महाराष्ट्रात तब्बल  45 प्लस अर्थात 45 हून जास्त खासदार निवडून आणण्याचं उद्दिष्ट महायुतीनं ठेवल्यामुळंच या सभांचं सत्र येत्या काळात राज्य दणाणून सोडणार आहे.