लोअर बॅकच्या दुखण्याकडे करू नका दुर्लक्ष! असू शकतात 'हे' गंभीर आजार

Lower back pain : आजच्या जगात प्रत्येकाचं आयुष्य हे धावपळीचं आहे. त्यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यापैकी एक म्हणजे पाठदुखी. पाटदुखीची समस्या ही आजच्या जगात साधारण आहे. ऑफिसला जाण्यासाठी ट्रेनच्या गर्दीतून तास-दोन तास प्रवास आणि मग त्यानंतर दिवसभर त्या खुर्चीत बसून काम केल्यानं पाठीच्या खालचा भाग म्हणजेच लोवर बॅक दुखू लागते. त्यामुळे कधी-कधी खूप भयानक वेदना होतात. जर तुमची पाठ सतत दुखत असेल तर त्याचे कारण काय असू शकते हे जाणून घेऊया...

| Jul 09, 2023, 18:13 PM IST
1/6

किडनी स्टोन

lower back pain

किडनी स्टोनमुळे पाठीच्या खालच्या भागात दुखू शकते. किडनी स्टोनमुळे अधूनमधून किंवा सतत दिसू शकतात आणि मळमळ या समस्या देखील होतात. असं होत असेल तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या. 

2/6

संधिवात

lower back pain

संधिवात सारख्या त्रासामुळे देखील पाठीच्या खालचा भाग दुखू शकतो. त्यामुळे पाठीच्या खालच्या भागात अनेकदा वेदना जाणवतात.  

3/6

हर्निएटेड डिस्क

lower back pain

पाठीच्या खालच्या भागात दुखणे म्हणजे तुम्हाला स्लिप डिस्कची समस्या देखील असू शकते. स्लिप डिस्कला हर्निएटेड डिस्क असेही म्हणतात. मणक्याच्या हाडांना आधार देण्यासाठी, त्यांना लवचिक ठेवण्यासाठी आणि त्यांना दुखापत आणि धक्क्यापासून वाचवण्यासाठी लहान पॅडेड डिस्क असतात. त्यालाच डिस्क असं म्हणतात. जर त्यासला दुखापत झाली तर त्याला स्लिप डिस्क असं म्हणतात. 

4/6

ऑस्टियोपोरोसिस

lower back pain

ऑस्टिओपोरोसिस ही एक अशी स्थिती आहे, ज्यामध्ये हाडे कमकुवत होतात, ज्यामुळे त्यांना फ्रॅक्चर होण्याची अधिक शक्यता असते. हे कोणत्याही वयात होऊ शकते. त्यामुळए पाठीच्या खालच्या भागात तीव्र वेदना होऊ शकतात.

5/6

स्पाइनल स्टेनोसिस

lower back pain

स्पाइनल स्टेनोसिस हा मणक्याचा गंभीर आजार आहे. या आजारात स्पाइनल कॅनल म्हणजेच पाठीचा कालवा अरुंद होतो. परिणामी, कालव्याच्या आत नसांवर दबाव येतो. त्यामुळे वेदना जाणवतात. 

6/6

lower back pain

(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)