Lucky Dreams : स्वप्नात मंदिर, महिलाही दिसतेय? जाणून घ्या यामागचा नेमका अर्थ

 तुम्हाला माहितीये का, ज्योतिषविद्येप्रमाणे त्याचाच एक भाग असणाऱ्या स्वप्नशास्त्रामध्ये अमुक एका व्यक्तीला पडणाऱ्या स्वप्नांविषयी सविस्तर माहिती देण्यात आली आहे. यानुसार तुम्हाला पडणारं प्रत्येक स्वप्न खूप काही सांगून जातं. तुम्हाला पडणाऱ्या काही स्वप्नांमध्ये देवी लक्ष्मीचं प्रतीक असतं. तर, काही स्वप्न तुम्हाला सावध करणारी असतात. आज आपण अशाच काही स्वप्नांविषयी माहिती करून घेणार आहोत जी तुम्ही भविष्यात धनाढ्य होणार आहात याचे संकेत देतात. 

Jan 06, 2023, 16:04 PM IST

Lucky Dreams Meaning : तुम्हाला माहितीये का, ज्योतिषविद्येप्रमाणे त्याचाच एक भाग असणाऱ्या स्वप्नशास्त्रामध्ये अमुक एका व्यक्तीला पडणाऱ्या स्वप्नांविषयी सविस्तर माहिती देण्यात आली आहे. यानुसार तुम्हाला पडणारं प्रत्येक स्वप्न खूप काही सांगून जातं. तुम्हाला पडणाऱ्या काही स्वप्नांमध्ये देवी लक्ष्मीचं प्रतीक असतं. तर, काही स्वप्न तुम्हाला सावध करणारी असतात. आज आपण अशाच काही स्वप्नांविषयी माहिती करून घेणार आहोत जी तुम्ही भविष्यात धनाढ्य होणार आहात याचे संकेत देतात. 

1/5

Lucky Dreams Meaning and impacts according to astrology

पैसे जपून वापरत असल्याचं स्वप्न तुम्हाला कधीच आर्थिक चणचण भासणार नाही, असे संकेत देतात. त्यामुळं स्वप्न कोणतंही असो, त्यामुळं न घाबरता त्याची खरी बाजू ओळखण्याचा विचार करा.    (वरील माहिती सर्वसामान्य संदर्भ आणि मान्यतांच्या आधारे घेण्यात आली असून, झी 24 तास याची खातरजमा करत नाही.)

2/5

Lucky Dreams Meaning and impacts according to astrology

पावसाची स्वप्न तुम्हाला पडत असल्यास त्यामुळं येत्या दिवसांमध्ये तुमच्यावर पैशांची बरसात होईल याचे संकेत मिळतात. 

3/5

Lucky Dreams Meaning and impacts according to astrology

स्वप्नात कधी तुम्ही असंख्य फुलं पाहिली आहेत? असं झाल्यास कुणा एका व्यक्तीकडून तुम्हाला आर्थिक लाभ मिळणार असल्याचं कळतं. 

4/5

Lucky Dreams Meaning and impacts according to astrology

लाल रंगाच्या साडीलाही लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं. त्यामुळं एखादी महिला किंवा तुमच्या स्वत:च्या आईला लाल रंगाच्या साडीमध्ये पाहणं अतिशय शुभ असतं. पूजाविधींमध्येही लाल रंगाला अनन्यसाधारण महत्त्वं आहे. 

5/5

Lucky Dreams Meaning and impacts according to astrology

गाढ झोपेत असताना तुमच्या स्वप्नात कधी एखादं मंदिर आलंय का? स्वप्नशास्त्रानुसार स्वप्नात मंदिर येणं अतिशय शुभ असतं. यामुळं तुमच्या घराची कवाडं लक्ष्मीसाठी खुली होतात.