तेराव्या वर्षी 10वी, 15व्या वर्षी बारावी, आता जगातील सर्वात लहान वयाची CA होण्याचा विक्रम... कोण आहे ही मुलगी?

World Youngest Female CA : मध्य प्रदेशमध्ये राहाणाऱ्या नंदिनी अग्रवाल या मुलीने जगातील सर्वात लहान वयात चार्टर्ड अकाऊंटंट होण्याचा विक्रम रचला आहे. अवघ्या 19 वर्षी तीने सीएमची परिक्षा पास केली आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्येही तिच्या नावाची नोंद करण्यात आली आहे. 

| Aug 15, 2024, 19:54 PM IST
1/6

मध्य प्रदेशमधल्या मुरैना गावात राहाणाऱ्या नंदिनी अग्रवाल या 19 वर्षांच्या मुलीला गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसने जगातील सर्वात लहान वयाची चार्टर्ड अकाऊंटंट असल्याची मान्यता दिली आहे. सीएच्या अंतिम परीक्षेत तीने संपूर्ण देशात अव्वल केलं होतं. 21 सप्टेंबर 2021 मध्ये ज्यावेळी तीने हा विक्रम केला त्यावेळी ती अवघी 19 वर्ष आणि 330 दिवसांची होती.  

2/6

नंदिनीचा मोठा भाऊ 21 वर्षांच्या सचिनने त्याच वर्षी सीए अंतिम परीक्षेत ऑल इंडिया 18 वा रँक मिळवला होता. नंदिनीने 2021 CA अंतिम परीक्षेत 800 पैकी 614 (76.75%) मार्कस मिळले. तीने  83,000 विद्यार्थ्यांमध्ये पहिलं स्थान मिळवलं. तर तिचा भाऊ सचिनला 568 मार्क्स मिळाले.  

3/6

नंदिनीने दिलेल्या माहितीनुसार ती 11 वीत असतना गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड संस्थेच्या अधिकाऱ्यांनी तिच्या शाळेला भेट दिली होती. त्याच वेळी मनाशी निश्चय केला की असा विक्रम करायचा जो कोणीच मोडू शकणार नाही' यानंतर आपण संपूर्ण लक्ष सीएमच्या परीक्षेवर केंद्रीत केल्याचं तीने सांगितलं.  

4/6

नंदिन आणि तिचा भाऊ सचिन हे दोघंनही शालेय जीवनापासून टॉपर होते. दोघांनीही बारावीत मुरैला जिल्ह्यात टॉप केलं होतं. नंदिनिला बारावीत 94.5% मार्क्स मिळाले होते. 

5/6

आपल्या यशात आपल्या भावाचा मोठा वाटा असल्याचं नंदिनी सांगते. अभ्यासात नेहमीच  त्याची मदत झाली. तर सचिनने आपल्या यशाचं श्रेय नंदिनीला दिलंय. नंदिनी प्रेरणादायी असून तिच्यामुळेच आपण अभ्यासात जास्त लक्ष देऊ शकलो असं सचिनने म्हटलंय. 

6/6

नंदिनी आणि सचिनचे वडील नरेश चंद्र गुप्ता कर व्यावसायिक आहेत. तर आई डिंपर गुप्ता गृहिणी आहेत. सर्वात कमी वयाचा पुरुष CA चा गिनीज रेकॉर्डही एका भारतीयाच्या नावे आहे. लखनऊच्या रामेंद्र चंद्र गांगुलीने मे 1956 मध्ये वयाच्या 19व्या वर्षी सीएम होण्याचा मान मिळवला होता.