Magh Purnima 2024 Upay : माघ पौर्णिमेला धन-समृद्धीसाठी करा 'हे' उपाय! 32 पटीने मिळेल फळ
Magh Purnima 2024 Upay : हिंदू धर्मात माघ पौर्णिमेला विशेष महत्त्व असून यादिवशी स्नान आणि दान केल्यामुळे पुण्य प्राप्त होते. यादिवशी धन समृद्धीसाठी ज्योतिषशास्त्रात उपाय सांगण्यात आले आहेत. हिंदू धर्मात सर्व पौर्णिमेला शास्त्रांमध्ये विशेष महत्त्व असून माघ महिन्याची पौर्णिमा अतिशय फलदायी मानली गेली जाते. असं म्हणतात यादिवशी सर्व देव देवता पृथ्वीवर येतात. माघी पौर्णिमेला स्नान करुन दान केल्यास बत्तीस पट पुण्य मिळते असं म्हणतात. त्यामुळे ही पौर्णिमेला बत्तीसी पौर्णिमा म्हणून ओळखली जाते.