महाभारतातील या 5 गोष्टी मुलांना नक्की सांगा; संकटातही सापडेल मार्ग

महाभारत या ग्रथांतील प्रत्येक गोष्टीतून एक अत्यंत महत्वाची शिकवण मिळते. प्रत्येकाने यातील शिकवणी आचरणात आणाव्यात. 

Nov 28, 2023, 16:53 PM IST

Mahabharat Gyan: महाभारत हा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र ग्रंथ आहे. या ग्रथांतील प्रत्येक कथा आपल्या आयुष्याशी निगडीत आहेत. पालकांनी आपल्या मुलांना महाभारतातील काही महत्वाच्या गोष्टी अवश्य सांगाव्यात. प्रत्येकाच्या आयुष्याशी निगडीत असलेल्या या गोष्टी मुलांना संकटातही यशाचा मार्ग दाखवतील.

1/7

चांगले, वाईट, मत्सर, द्वेष, अहंकार, प्रेम, आनंद, भेदभाव अशा सर्व प्रकारच्या मानवी भावना या महाभारात या ग्रथांत आढळतात. 

2/7

एका चुकीमुळे आयुष्य उद्धवस्त होते. पांडवांना जुगार खेळायची सवय होती. जुगार खेळण्याच्या वाईट सवयीमुळे पांडवांनीही आपल्या पत्नी गमावल्या. थोड्या काळासाठीही चुकीची कामे करू नका.     

3/7

 कौरवांसोबत लढताना पांडवांनी कधीच पराभव स्वीकारला नाही. पांडवांनी वनवास सहन केला. अनेक वर्ष संयम बाळगला. योग्य वेळी ते कौरवांसह लढले आणि युद्धात विजय मिळवला.

4/7

कर्ण हा अर्जुनापेक्षा मोठा योद्धा होता. मात्र, दुर्योधनाच्या वाईट संगतीमुळे तो वाईटाच्या बाजूने लढला. वाईटाची संगत केल्याने त्याचा सर्व चांगुलपणा आणि सद्गुण नष्ट झाले. शेवटी त्याचा अंत झाला. यामुळे वाईटाची संगत कधीच करु नये.  

5/7

आईच्या उदरातच अभिमन्यूने चक्रव्यूह तोडले. मात्र, यातून बाहेर कसे पडायचे हे त्याला माहित नव्हते. मात्र, तो मोठ्या धीराने लढला आणि चक्रव्युहातून बाहेर पडला. 

6/7

महाभारतातील कथेनुसार अर्जुन सर्वोत्तम धनुर्धारी आहे. जेव्हा गुरु द्रोणाचार्य सर्व पांडव आणि कौरवांच्या धनुर्विद्येची चाचणी घेतात तेव्हा अर्जुन जे उत्तर देतो त्यावरुन त्या आपल्या ध्येयाप्रती किती एकाग्र आहे ते दिसून येते. आपल्याला फक्त पक्षाचा डोळा  दिसतो. ध्येय प्राप्तीसाठी एकाग्रता आणि कुशलता अत्यंत महत्वाची आहे. 

7/7

महाभारत ग्रंथातील काही गोष्टी आयुष्यात अत्यंत महत्त्वाच्या आणि तितक्याच समर्पक देखील आहेत. आजच्या पिढीसाठी देखील या गोष्टी निश्चितच मार्गदर्शक ठरतील. महाभारतातील विविध कथा एक वेगळा अर्थ आहे. महाभारतातील प्रत्येक पात्राकडून काहीतरी शिकण्यासारखे आहे.