पाण्याची बादली आणि हातात झाडू... पीएमो मोदींकडून काळाराम मंदिरात स्वच्छतेची सेवा...Photo

PM Modi in Mahaharashtra : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर होते. या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिक शहरातील पंचवटीतल्या ऐतिहासिक श्री काळाराम मंदिराला भेट दिली. मोदी यांनी काळाराम मंदिरात स्वच्छता केल्याचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये पंतप्रधान मोदी स्वतः स्वच्छता करताना दिसत आहेत.

| Jan 12, 2024, 16:24 PM IST
1/7

पीएम मोदी यांनी काळाराम मंदिरात श्रीरामाचं मनोभावे दर्शन घेतलं. यावेळी पंतप्रधान मोदींच्‍या हस्‍ते काळाराम मंदिरात विधीवत पूजा आणि आरती देखील करण्यात आली. काळाराम मंदिर हे नाशिकच्या पंचवटीमध्ये आहे. 

2/7

श्रीरामाचं दर्शन घेतल्यानंतर पीएम मोदी यांनी काळाराम मंदिर परिसरात स्वच्छता केली.  स्वच्छतेचं महत्त्व अधोरेखित करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंदिर परिसरात बादली आणि मॉबने स्वच्छतेची सेवा केली.

3/7

राम मंदिरात प्राणप्रतिष्ठेच्या पार्श्वभूमीवर देशातील सर्व मंदिरात आणि तीर्थक्षेत्रांवर स्वच्छता अभियान चालवा आणि श्रमदान करा असं आवाहन पीएम मोदींनी केलं. आज मला काळाराम मंदिराची स्वच्छता करण्याचे सौभाग्य मिळालं असल्याचं ते म्हणाले

4/7

पंतप्रधान मोदींनी रामकुंडावर जलपूजन केल्यानंतर काळाराम मंदिरात दर्शन घेतलं...यावेळी मोदींनी मंदिरात आरती केली...दर्शनानंतर मोदी भजनात तल्लीन झाले. यावेळी मोदींनी टाळ वाजवून श्रीरामाचं भजन गायलं...

5/7

पंतप्रधान मोदींनी रोड शोनंतर गोदावरी तीरावर असलेल्या रामकुंडावर जलपूजन केलं...यावेळी सर्व आखाड्यांचे महंत उपस्थित होते...मोदींनी रामकुंडावर जलपूजन केल्यानंतर काळाराम मंदिरात जाऊन दर्शन घेतलं...मोदींच्या या दौ-यादरम्यान जय श्री रामच्या घोषणांनी नाशिक दुमदुमून गेलं..

6/7

अयोध्येत रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेआधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 11 दिवसांचे अनुष्ठान सुरु केलंय.. नाशिकच्या काळाराम मंदिरातून त्यांनी या अनुष्ठानाला सुरुवात केलीये.. प्राणप्रतिष्ठे आधी मोदी 11 दिवस उपवास करणार आहेत...तसंच अष्टांग योगातील 'यम' नियमांचे पालन करणार आहेत..

7/7

रामायणाशी निगडित ठिकाणांपैकी पंचवटी हे सर्वात विशेष आणि महत्त्वाचे स्थान मानले जातं. प्रभू श्रीराम, माता सीता आणि लक्ष्मण यांनी पंचवटीत असलेल्या दंडकारण्य जंगलात काही वर्षे घालवली. पंचवटी नावाचा अर्थ 5 वटवृक्षांची जमीन.