Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची रणनिती ठरली, 'या' 4 नेत्यांवर प्रचाराची धुरा

Maharashtra Assembly Election 2024 : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नोव्हेंबर महिन्यात विधानसभा निवडणूक होणार असल्याचे संकेत दिले आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची रणनिती ठरली आहे. राज्यातील प्रचाराची धुरा 4 नेत्यांवर देण्यात आल्याच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलंय. 

Sep 06, 2024, 13:41 PM IST
1/8

विधानसभा निवडणूक ही भाजपसाठी अतिशय मह्त्त्वाची आहे. लोकसभा निवडणुकीचा राज्यातील निकाल पाहिल्यानंतर भाजपने कंबर कसलंय. राज्यातील प्रचाराची धुरा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सोपण्यात आलीय. 

2/8

त्यासोबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावरही विधानसभा निवडणुकीची जबाबदारी असणार आहे. 

3/8

गडकरींसह भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे प्रचाराची रणनिती ठरवणार आहेत. 

4/8

फडणवीस, गडकरी, बावनकुळे या नेत्यांसह रावसाहेब दानवे यांच्याकडे विधानसभा निवडणुकीचे संयोजक ही जबाबदारी देण्यात आलीय. 

5/8

त्याशिवाय संयोजन समितीमधील 21 नेते निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत. नारायण राणे, सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुंडे, विजया रहाटकर यांचा समावेश आहे. 

6/8

6 चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, अशोक चव्हाण, रवींद्र चव्हाण

7/8

प्रवीण दरेकर, भाई गिरकर, अशोक नेते, राधाकृष्ण विखे पाटील

8/8

अतुल सावे, संजय कुटे, जयकुमार रावळ, रक्षा खडसे आणि मुरलीधर मोहोल यांचा समावेश आहे.