बहुमताच्या अर्धीही आमदार संख्या नसताना 'हा' नेता झालेला CM; यादीतलं शेवटून दुसरं नाव थक्क करणारं

Leader Who Become CM With Least Number Of MLA: सर्वात कमी आमदार असूनही मुख्यमंत्रिपदवर विराजमान झालेला महाराष्ट्रातील नेते कोण आहेत हे तुम्हाला ठाऊक आहे का? महाराष्ट्रातील मागील 30 वर्षांच्या इतिहासावर लक्ष टाकल्यास या विषयी फारच रंजक आकडेवारी पाहायला मिळते. याचसंदर्भात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेऊयात एक विशेष आढावा...

| Oct 19, 2024, 16:27 PM IST
1/13

cmofmaharashtra

सध्या महायुती आणि महाविकास आघाडीच्या जागावाटपावरुन चर्चा सुरु आहे. सामान्यपणे ज्या पक्षाकडे अधिक आमदार त्यांचा मुख्यमंत्री असं समिकरण मांडलं जातं. मात्र असेही काही मुख्यमंत्री आहेत जे फार कमी आमदार असताना या पदापर्यंत पोहोचले. या यादीमध्ये अर्थात विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेतच. मात्र त्याचबरोबर असलेले इतर दिग्गज नेते कोण हे पाहूयात...

2/13

cmofmaharashtra

आधी सर्वाधिक आमदार असताना मुख्यमंत्री झालेल्या नेत्यांमध्ये दवेंद्र फडणवीस यांचं नाव घ्यावं लागेल. 2014 ते 2019 या पाच वर्षाचा संपूर्ण कार्यकाळ मुख्यमंत्री म्हणून युतीचे देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा गाडा हाकला.

3/13

cmofmaharashtra

पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारे फडणवीस हे 20 वर्षानंतरचे पहिले मुख्यमंत्री ठरले होते. यावेळेस भाजपाच्या आमदारांची संख्या 122 इतकी होती. केंद्रात मोदी सरकार पहिल्यांदा आल्याचा फायदा भाजपाला राज्यातही झाला होता.  

4/13

cmofmaharashtra

2009 ते 2014 च्या कालावधीत सलग तिसऱ्यांदा राज्यात आघाडीची सत्ता आली. यावेळेस आधी काँग्रेसचे अशोक चव्हाण आणि नंतर पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे मुख्यमंत्रि‍पदाची जबाबदारी सोपवली गेली. यावेळेस काँग्रेसच्या आमदारांची संख्या होती 82!

5/13

cmofmaharashtra

नंतर 1999 ते 2004 दरम्यान आघाडीच्या सरकारमध्ये आधी काँग्रेसचे विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते आणि नंतर त्यांच्याच पक्षातील सहकारी सुशीलकुमार शिंदेंकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली. तेव्हा काँग्रेसचे एकूण 75 आमदार निवडून आले होते.  

6/13

cmofmaharashtra

1995 ते 1999 दरम्यान आधी शिवसेनेचे मनोहर जोशी आणि नंतर त्याच पक्षाचे नारायण राणे हे मुख्यमंत्री होते. त्यावेळेस शिवसेनेचे एकूण 73 आमदार होते.  

7/13

cmofmaharashtra

2004 ते 2009 या पुढील पाच वर्षाच्या कार्यकाळात पुन्हा महाराष्ट्राला दोन मुख्यमंत्री लाभले. यावेळेसही राज्यात काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकार होतं. आधी काँग्रेसचे नेते विलासराव देशमुख यांनी मुख्यमंत्रीपद संभाळलं. विलासराव दुसऱ्यांदा राज्याचे मुख्यमंत्री झाले. 

8/13

cmofmaharashtra

2004 ते 2009 च्या सरकारच्या उत्तरार्धात विलासरावचेच सहकारी अशोक चव्हाण यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची जबबादारी सोपवण्यात आली. या कार्यकाळात काँग्रेसकडे एकूण 68 आमदार होते.

9/13

cmofmaharashtra

2019 ते 2022 या अडीच वर्षाच्या कालावधीत राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग माजी मुख्यमंत्री शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली झाला आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले.

10/13

cmofmaharashtra

2019 च्या निवडणुकीनंतर मुख्यमंत्रिपद अडीच अडीच वर्ष वाटून घेण्याच्या मुद्द्यावरुन निकाल आल्यानंतर भाजपा-शिवसेनेत बिनसल्यानंतर त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर एकत्र येत सरकार स्थापन केलं. या सरकारमध्ये केवळ 56 आमदार असूनही उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले होते.  

11/13

cmofmaharashtra

2022 ते आतापर्यंत दोन्ही काँग्रेसबरोबर तडजोड करुन बनवलेल्या महाविकास आघाडी सरकारविरुद्ध एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेतील 40 आमदारांनी बंड केल्याने उद्धव ठाकरेंचं सरकार पडलं. त्यानंतर नाट्यमय घडामोडी घडत गेल्या आणि मुख्यमंत्री पदाची माळ थेट एकनाथ शिंदेंच्या गळ्यात पडली.  

12/13

cmofmaharashtra

शिंदे मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांच्याकडे केवळ 40 आमदार होते. 105 आमदार असलेल्या भाजपाने त्यांना समर्थन देत सरकार स्थापन केलं आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले.  

13/13

cmofmaharashtra

त्यामुळेच सर्वात कमी आमदार म्हणजेच बहुमतासाठी लागणाऱ्या 144 या संख्येच्या अर्धीही आमदार संख्या नसतानाही मुख्यमंत्री झालेल्या नेत्यांच्या यादीत एकनाथ शिदेंचं नाव आघाडीवर आहे. कमी आमदार असताना मुख्यमंत्री झालेल्या नेत्यांच्या यादीत विद्यमान मुख्यमंत्र्यांच्या खालोखाल उद्धव ठाकरे (56 आमदार), विलासराव देखमुख तसेच अशोक चव्हाण (68 आमदार), मनोहर जोशी आणि नारायण राणे (73 आमदार) आणि विलासराव देशमुख व सुशील कुमार शिंदे (75 आमदार) या पाच कार्यकाळांचा उल्लेख करता येईल.