अमित ठाकरे विधानसभेच्या रिंगणात उतरणार, 'या' मतदारसंघातून निवडणूक लढवणार?

Vidhansabha Election 2024 : विधानसभा निवडणूक 2024 मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वबळावर लढण्याची शक्यता आहे. यादृष्टीने मनसेने राज्यभर उमेदवारांची चाचपणी सुरु केली आहे.  अमित ठाकरेही विधानसभा निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. 

| Sep 27, 2024, 15:22 PM IST
1/6

अमित ठाकरे विधानसभेच्या रिंगणात उतरणार, 'या' मतदारसंघातून निवडणूक लढवणार?

2/6

लोकसभा निवडणुकीत महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतलेल्या राज ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीत स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्र दौरा सुरु केला आहे.

3/6

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेने राज्यभर उमेदवारांची चाचपणी सुरु केली आहे. राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने यापूर्वी 7 उमेदवार जाहीर केले आहेत. आता अमित ठाकरेही विधानसभा निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.

4/6

अमित ठाकरे विधानसभेच्या मैदानात उतरणार असल्याची माहिती मिळतेय. अमित ठाकरे भांडुप विधानसभेतून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. तशी आग्रही मागणी कार्यकर्त्यांकडून राज ठाकरेंकडे केल्याची माहिती झी 24 तासला सूत्रांनी दिलीय.

5/6

मात्र यावर अंतिम निर्णय राज ठाकरे घेणार आहेत. भांडुप विधानसभा मतदारसंघ अमित ठाकरे यांच्यासाठी सर्वांत सुरक्षित असल्याचा अहवाल मनसे नेत्यांनी राज ठाकरेंकडे दिल्याचं कळतंय..

6/6

भांडुपसह मागाठाणे, माहीम मतदार संघातही चाचपणी सुरू असल्याची माहिती आहे. याशिवाय पुणे आणि नाशिक जिल्ह्यातून निवडणूक लढवावी अशी मागणीही कार्यकर्त्यांकडून केली जात आहे.