Maharashtra Tourism: फक्त महाबळेश्वर नाही... महाराष्ट्रातील हनीमून स्पेशल पर्यटन स्थळ; इथं गेल्यावर परत यावसं वाटणारच नाही!

Honeymoon Tourist Destination in Maharashtra: हनीमून ट्रीपचा प्लान असेल तर महाराष्ट्रातील ही पर्यटन स्थळ बेस्ट ऑप्शन आहेत.  नव्या जोडप्यांच्या आयुष्यातील हनीमून हा खूपच खास क्षण असतो.  लग्नाचं प्लानिंग करताना जोडपी  हनीमूनचं प्लानिंग करतात. महाबळेश्वरला जोडप्यांची पहिली पसंती असते. मात्र, महाबळेश्वर व्यतीरीक्त आणखी काही पर्यटन स्थळ आहेत जिथे हनीमूनसाठी जाता येईल.

| May 21, 2024, 11:33 AM IST
1/7

महाबळेश्वर हे महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध हनीमून डेस्टिनेशन आहे. 

2/7

लोणावळा, खंडाळा  मध्ये देखील हनीमून ट्रीप प्लान करु शकता. निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या लोणावळा, खंडाळा परिसरात अनेक रिसॉर्ट आणि व्हिला आहेत. येथे जोडीदारासोबत क्वालिटी टाईम स्पेंड करता येईल.   

3/7

 माथेरान हे ठिकाण मुंबई, पुण्यापासून अगदी जवळचे ठिकाण आहे. यामुळे सुट्टी मिळत नसेल किंवा वेळ कमी असेल तर माथेरान हा सर्वोत्तम पर्याय आहे. कोणत्याही सिजनमध्ये माथेरानमध्ये पर्यटनाचा आनंद लुटता येतो.

4/7

अलिबाग हा चांगला पर्याय आहे. अगदी कमी बजेटमध्ये येथे  हनीमून ट्रीप प्लान करता येईल. 

5/7

 कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणारे मालवण देखील खुपच सुंदर आहे. मालवणमधील सुंदर समुद्र किनाऱ्यावर जोडीदारासह निवांत वेळ घालवता येईल. तसेच इथे तुम्हाला वॉटर स्पोर्ट्सचा देखील आनंद लुटता येईल. 

6/7

रत्नागिरी हा एक बेस्ट ऑप्शन आहे. अथांग, शांत समुद्र किनाऱ्यांसह रत्नागिरी जिल्ह्यात अनेक पर्यटनस्थळ आहे. गणपती पुळे, दापोली, हरिहरेश्वर यासह अनेक प्रसिद्ध टूरीस्ट पॉईंट रत्नागिरी जिल्ह्यात आहेत.   

7/7

महाबळेश्वर व्यतीरीक्त महाराष्ट्रात आणखी काही अशी हनीमून स्पेशल पर्यटन स्थळ आहेत.