पावसाळ्यात 'या' 7 कारणांसाठी महाबळेश्वरला एकदा तरी नक्की भेट द्या

Mahabaleshwar in Mansoon:  'हिरवीगार वनराई' आणि कोवळ्या ऊन्हात दिसणारा 'इंद्रधनुष्य', पावसाळ्यातील निसर्गाचं हे विहंगमय दृष्य डोळ्यांना कायमच सुखावणारं असतं. साताऱ्यातील महाबळेश्वर म्हणजे पृथ्वीवरचा 'स्वर्ग' आहे, असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही.   

Jun 21, 2024, 10:18 AM IST
1/8

महाबळेश्वरला निसर्गसौंदर्याचं वरदान लाभलं आहे. हिरवागार डोंगर ,धुक्यात हरवलेली वाट आणि पक्ष्यांचा किलबिलाट, निर्सागाचा हा नजारा पहायचा असेल तर महाबळेश्वर हे सर्वोत्तम ठिकाण आहे.   

2/8

ओसंडून वाहणारे धबधबे

पावसाळ्यात महाबळेश्वरला ओसंडून धबधबे वाहत असतात. लिंगमाला , धोबी , वजराई या धबधब्यांवर येण्यास पर्यटक कायमच पसंती देतात. वजराई हा देशातील दुसऱ्या क्रमांकाचा उंच धबधबा आहे,त्यामुळे निसर्गप्रेमी या धबधब्याचा आनंद घ्यायला येतात. 

3/8

धुक्यात हरवणारी वाट

पावसाने वातावरणात पसरलेला गारवा, डोंगरावरुन दिसणारा इंद्रधनुष्य आणि धुक्यात हरवून गेलेलं महाबळेश्वरचं सौंदर्य प्रत्येकाने एकदा तरी अनुभवलंच पाहिजे. 

4/8

वेण्णा तलाव

वेण्णा तलाव हे महाबळेश्वरमध्ये येणाऱ्या पर्यटकांना कायमच आकर्षित करतो.  स्वच्छ अशा या वेण्णा तलावातून बोटींग करताना तुम्हाला निसर्गाचा मनमुराद आनंद घेता येतो.   

5/8

शांत ठिकाण

हिरवा शालू पांघरलेला डोंगर मन वेधून घेतो. जर तुम्ही फिल्ममेकर असाल, तर महाबळेश्वरला तुम्ही एकदा तरी जायलाच हवं. या ठिकाणी माणसांची वर्दळ कमी असते. त्यामुळे फोटोग्राफी आणि सिनेमाच्या शुटींगकरीता हे ठिकाण उत्तम आहे.   

6/8

स्टॉबेरी

स्टॉबेरी महाबळेश्वरची खासिय्यत आहे. जर तुम्हाला ही स्टॉबेरी खायला आवडत असेल तर महाबळेश्वरला नक्की जाऊन या. 

7/8

मसाई पठार

महाबळेश्वरपासून जवळ असलेलं मसाई पठार हे पर्यटकांना आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे.  विस्तीर्ण आभाळ आणि रानफुलांनी सजलेलं मसाई पठार हे स्वर्गसुखाची अनुभूती देतं. 

8/8

ट्रेकींगसाठी खास ठिकाण

पावसाळ्यात भजी, चहा आणि मनसोक्त भिजायला प्रत्येकालाच आवडतं. पाऊस म्हटलं की अनेकांना ट्रेकींगला जाण्याचे वेध लागतात. जर तुम्ही ट्रेकींगचा प्लॅन करत असाल तर पावसाळ्यात महाबळेश्वरचा प्लॅन नक्की करा.