Prajakta Mali: 'मी साडे चार वर्षांपूर्वी....,'प्राजक्ता माळीचा लव्ह लाईफबाबत मोठा खुलासा

Prajakta Mali: अभिनेत्री प्राजक्ता माळी संपूर्ण महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री आहे. अभिनयाबरोबरच प्राजक्ता उत्तम नृत्यांगणा आणि सूत्रसंचालिकाही आहे. प्राजक्ताने काही दिवसांपूर्वीच ‘प्राजक्तराज’ म्हणून तिचा नवा ज्वेलरी ब्रँड सुरू केला. आता ती एक व्यावसायिकाही आहे. प्राजक्ता तिच्या कामामुळे कायमच चर्चेत राहिली आहे. तसेच तिच्या खासगी आयुष्याबाबतही अनेक चर्चा रंगताना दिसतात. त्यानंतर आता प्राजक्ताच्या खासगी आयुष्याबाबत जाणून घेण्यासाठी तिचा चाहता वर्ग प्रचंड उत्सुक आहे. 

Feb 14, 2023, 14:49 PM IST
1/5

मराठी मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारी अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. कधी ती शेअर करत असलेल्या ग्लॅमरस फोटोशूटमुळे तर कधी तिच्या हटके पोस्टमुळे…  

2/5

अभिनेत्री प्राजक्ता माळी जेव्हा अकरावीत होती, त्यावेळी ती एका मुलाच्या प्रेमात पडली होती. आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी तिने एक कविता लिहिली होती.

3/5

प्रेमाचां रंग ओळखल्या जाणाऱ्या लाल रंगाच्या पेनाने तिने ही कविता लिहीली होती. “प्यार, इश्क, मोहब्बत…ये लब्जभी…सरल शब्द जैसे, सरल नहीं…तो क्या इसके रास्ते और मंजिले क्या खाक सरल होंगे….” अशा ओळींची तिने ही प्रेम कविता लिहिली होती. 

4/5

सध्या प्राजक्ता सिंगल असल्याचं सांगितलं जातंय. काही दिवसांपूर्वीच तिनं तिच्या लग्नासंदर्भातही एक खुलासा केला होता. ‘तशी लग्नाची तयारी सुरू आहे; पण नवरदेव भेटणं अद्याप बाकी आहे’,असं तिने म्हटलं होतं. 

5/5

प्राजक्ताने आपल्या खाजगी आयुष्याबाबत एक खुलासा केला आहे. एका मुलाखतीत प्राजक्ता माळीला तू शेवटचं डेट कधी केलं आहेस? असा प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाचं उत्तर देत प्राजक्ता म्हणाली मी साडे चार वर्षांपूर्वी शेवटचं डेट केलं आहे.