Mahashivratri 2024 : महाशिवरात्रीच्या पूजेच्या वेळी चुकूनही 'या' 6 चुका करू नका!

Mahashivratri 2024 : फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला महाशिवरात्री पवित्र सण मोठ्या थाट्या माट्या आणि उत्साहात साजरा होतो. आख्यायिकानुसार या दिवशी भगवान शंकराचा माता पार्वतीसोबत विवाह झाला असून भोलेनाथ पहिल्यांदा ज्योतिर्लिंगात अवतरले होते असं म्हणतात. यादिवशी शंकराची पूजा करताना 6 चुका करू नका अन्यथा महादेव नाराज होतील.     

Feb 27, 2024, 10:59 AM IST
1/7

शिवलिंगाची पूर्ण परिक्रमा घालू नका

धार्मिक शास्त्रानुसार भगवान भोलेनाथाची पूजा करताना चुकूनही शिवलिंगाची पूर्ण परिक्रमा घालू नयेत. या अर्ध क्रांतीला चंद्र क्रांती असं म्हटलं जातं.

2/7

शंखाने अभिषेक टाळा

धार्मिक ग्रंथानुसार भगवान शंकराच्या पूजेदरम्यान अभिषेक करताना शंखाचा वापर टाळा. पौराणिक कथेनुसार भगवान शिवाने शंखचूड नावाच्या राक्षसाचा वध केल्यामुळे भगवान शंकराला पूजेमध्ये शंखाचा वापर अशुभ मानलं जातं. 

3/7

बेलपत्राबद्दल ही चूक करु नका!

धार्मिक ग्रंथानुसार महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराला बेलपत्र अर्पण करणं शुभ मानले जाते. मात्र बेलपत्रं कोठेही तुटलेली, फाटलेली किंवा खंडित असू नये. बेलपत्र अर्पण करताना ओम नमः शिवाय मंत्राचा जप करणे खूप शुभ असतं.   

4/7

ही गोष्ट टाळा

भोलेनाथची पूजा करताना चुकूनही हळद, कुंकू, रोळी अर्पण करणे टाळा. हे सर्व स्त्री तत्व मानले जाते असल्याने शिवलिंग हे पुरुष तत्व असतं. त्यामुळेच भोलेनाथाच्या पूजेत हळद, कुंकू आणि रोळी अर्पण करणे बंद असतं. हळदीऐवजी तुम्ही भोलेनाथला पिवळे चंदन अर्पण करा.

5/7

तुळशीची पाने

भोलेनाथाची पूजा करताना चुकूनही तुळशीची पाने अर्पण करु नका. तुळशीची पान केवळ भगवान शिवालाच नव्हे तर संपूर्ण शिव कुटुंबाला तुळशी अर्पण करणे अशुभ मानले जाते.

6/7

केतकी आणि कणेरची फुलं

 केतकी आणि कणेरची फुलं महादेवाला अर्पण करणे टाळा. असे केल्याने भगवान भोलेनाथांना संताप होतो असा समज आहे. 

7/7

महाशिवरात्रीला या गोष्टी अर्पण करा

महाशिवरात्रीला भोलेनाथांना बेलपत्र, भांग, धतुरा, आक आणि शमीची पाने अर्पण केल्यास महादेव प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात, अशी मान्यता आहे.