Mahesh Babu च्या 11 वर्षाची लेक एका जाहिरातीनं झाली कोट्याधीश, मानधनाचा आकडा पाहाच

Mahesh Babu's daughter sitara : दक्षिणात्य अभिनेता महेश बाबू हा लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. महेश बाबूची लेक समिरा काही दिवसांपूर्वी तिच्या टाइम्स स्क्वेअरवर प्रदर्शित झालेल्या तिच्या जाहिरातीमुळे चर्चेत आली होती. महेश बाबू आणि त्याची पत्नी नम्रता शिरोडकरला लेकीची जाहिरात टाइम्स स्क्वेअरवर झळकल्याचे पाहून आनंद गगनात मावत नव्हता. त्या दोघांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सिताराचा अभिमान असल्याचे सांगितले होते. 

| Jul 10, 2023, 17:22 PM IST
1/7

सितारा आहे ब्रॅंड अम्बॅसिडर

MaheshBabusdaughtersitaraPMJJewels

सितारा ही PMJ Jewels ची ब्रॅंड अम्बॅसिडर आहे. 

2/7

सिताराच्या नावाचं आहे कलेक्शन

MaheshBabusdaughtersitaraPMJJewels

सिताराच्या नावावर PMJ Jewels नं Sitara's signature collection सुरु केलं आहे.   

3/7

टाइम्स स्क्वेअरवर झळकली सितारा

MaheshBabusdaughtersitaraPMJJewels

4 जुलै रोजी सितारा ही टाइम्स स्क्वेअरवर झळकली. 

4/7

जाहिरातीसाठी घेतले इतरे मानधन

MaheshBabusdaughtersitaraPMJJewels

रिपोर्ट्सनुसार, सितारानं या जाहिरातीसाठी एक कोटी घेतल्याचं म्हटले जाते. 

5/7

सिताराचं ट्रेडिश्नल फोटोशूट

MaheshBabusdaughtersitaraPMJJewels

सितारानं केलेलं हे फोटोशूट पारंपारिक होतं. तिनं या फोटोशूटसाठी पारंपारिक साडी नेसली होती आणि त्यासोबत दागिने देखील घातले होते. 

6/7

इतक्या लहान वयात आहेत इतके फॉलोवर्स

MaheshBabusdaughtersitaraPMJJewels

सितारा 11 वर्षांची असून तिचे इन्स्टाग्राम अकाऊंटवर 1.2 मिलियन फॉलोवर्स आहेत. (All Photo Credit : Sitara Instagram)

7/7

चित्रपटसृष्टीत केलं पदार्पण

MaheshBabusdaughtersitaraPMJJewels

सितारानं वडील महेश बाबूच्या सरकारू वारी पाता या चित्रपटातील 'पेन्नी' या गाण्यातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं आहे.