विवेक बिंद्रा-संदीप माहेश्वरी वादात महेश्वर यांची उडी, यांनीच केला होता अरिंदम चौधरीचा भांडाफोड!

Dec 26, 2023, 20:32 PM IST

मोटिव्हेशनल स्पीकर विवेक बिंद्रा यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत आहेत. सुरुवातीला संदीप माहेश्वरी यांनी फसणुकीचे आरोप केले. त्यानंतर बिंद्रा यांच्या पत्नीने मारहाणीचे आरोप केले. आता या प्रकरणात महेश्वर पेरी यांच्या एंट्रीने विवेक बिंद्रा यांची डोकेदुखी आणखी वाढली आहे.

आता महेश्वर पेरी नेमके कोण आहेत आणि त्यांनी विवेक बिंद्रा यांच्यावर कोणते आरोप केले हे आपण जाणून घेणार आहोत.

 

1/7

महेश्वर पेरी यांनी विवेक बिंद्रावर केला आरोप

maheshwer peri claims of vivek bindra

मोटिव्हेशनल स्पीकर विवेक बिंद्रा यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत आहेत. सुरुवातीला संदीप माहेश्वरी यांनी फसणुकीचे आरोप केले. त्यानंतर बिंद्रा यांच्या पत्नीने मारहाणीचे आरोप केले. आता या प्रकरणात महेश्वर पेरी यांच्या एंट्रीने विवेक बिंद्रा यांची डोकेदुखी आणखी वाढली आहे.

2/7

कंपनीचा केला डेटा चेक

maheshwer peri claims of vivek bindra

महेश्वर पेरी यांनी विवेक बिंद्रा यांच्या कंपनीच्या वेबसाइटवर जाऊन बॅलेंसशीट डाउनलोड करून डेटा चेक केला. त्यांनी विवेक बिंद्रा यांना मिळालेल्या डॉक्टरेट बद्दल माहिती प्राप्त केली.  

3/7

दोन वर्षांत 308 कोटी रुपयांची उलाढाल

maheshwer peri claims of vivek bindra

बैलेंसशीट पाहून महेश्वर पेरी यांना आश्चर्याचा धक्का बसला.एका वर्षात विवेक बिंद्रा यांच्या कंपनीत तब्बल 172 कोटी रुपयांची तर दोन वर्षांत 308 कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचे समोर आले.  

4/7

मल्टी लेव्हल मार्केटिंगमधून केला घोटाळा

maheshwer peri claims of vivek bindra

विवेक बिंद्रा यांच्या कंपनीची 225 कोटी रुपये एवढी केवळ फ्रेंचायझी फी होती.याचा संबंध मल्टी लेव्हल मार्केटिंगशी होता.  

5/7

लाखो रुपयांची हेराफेरी केल्याचा आरोप

maheshwer peri claims of vivek bindra

महेश्वर पेरी यांनी विवेक बिंद्रा यांच्या 1 लाख ते 20 लाख रुपयांचे दावे करणारे व्हिडीओ पाहिले. महेश्वर पेरी यांच्या म्हणण्यानुसार ते करोडो रुपये कमवत आहेत. तरी आपल्या कर्मचाऱ्यांना कमी पगार देत आहे. यामध्ये काहीतरी गडबड आहे असा दावा त्यांनी केला आहे.  

6/7

लाखो मुलांची फसवणूक

maheshwer peri claims of vivek bindra

 विवेक बिंद्रा यांनी लाखो मुलांची फसवणूक केली आहे असा आरोप केला आहे.

7/7

महेश्वर पेरी यांनी यापूर्वी देखील केली होती पोलखोल.

maheshwer peri claims of vivek bindra

महेश्वर पेरी यांनी यापूर्वी देखील IIPM आणि अरिंदम चौधरी यांची पोलखोल केली होती.त्यांनी IIPM बिजनेस स्कूल रॅकींग आणि प्लेसमेंट रेकॉर्ड मधील फेरफार उघडकीस आणली होती.