PHOTO : पहिल्या चित्रपटाने बनवलं स्टार; नंतर अपघात, घटस्फोट आणि कर्करोगावर मात करत पुन्हा करतेय जबरदस्त कमबॅक, संपत्तीचा आकडा ऐकून व्हाल अवाक्

Entertainment : 3000 तरुणींमधून हिची निवड झाली आणि पहिलाच चित्रपटातून ती स्टार झाली. पण तिचं आयुष्य तितकं सोपं नव्हतं. नशिबाने तिची कठोरातील कठोर परीक्षा घेतली. त्यावर मात करत तिने ती पुन्हा एकदा जबरदस्त कॅमबॅक करतेय. 

Sep 13, 2024, 09:44 AM IST
1/7

आम्ही बोलत आहोत बॉलिवूड अभिनेत्री महिमा चौधरी जिचा आज 51 वा वाढदिवस आहे. महिमाचा जन्म दार्जिलिंगमध्ये झाला. सुभाष घई यांच्या 'परदेस' या चित्रपटातून त्यांनी अभिनयाच्या दुनियेत प्रवेश केला आणि ती रातोरात स्टार झाली. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, सुभाष घईने या चित्रपटासाठी माधुरी दीक्षितला साईन केलं होतं. नंतर महिमा चौधरीला घेण्यात आलं. 

2/7

1990 मध्ये तिने अभ्यास सोडून मॉडेलिंगकडे वळले. आपल्या मॉडेलिंग करिअरमध्ये तिने ऐश्वर्यासोबत अनेक जाहिरातींमध्येही काम केलंय. महिमाला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती आणि सुभाष घई यांच्या चित्रपटामुळे तिचं स्वप्न पूर्ण झालं. एका म्युझिक चॅनलमध्ये व्हीजे म्हणूनही कामही केलंय.

3/7

तिच्या कारकिर्दीच्या सुरुवातीलाच एक भयानक अपघात झाला होता. या अपघातामुळे तिचा चेहरा विद्रूप झाला होता. या अपघाताबाबत बोलताना महिमाने सांगितलं होतं की, 'दिल क्या करे' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान स्टुडिओत जात असताना तिचा अपघात झाला होता. गाडीच्या सर्व काचा माझ्या चेहऱ्यावर लागल्या होत्या. त्यावेळी मला वाटलं की मी मरत आहे. तसंच त्यावेळी मला मदत करायला कोणीही नव्हतं. दवाखान्यात पोहोचल्यावर माझा चेहरा पाहून घाबरले. शस्त्रक्रियेद्वारे माझ्या चेहऱ्यावरील 67 काचेचे तुकडे काढण्यात आले होते.

4/7

महिमा चौधरीने अभिनयाच्या जगात एक वेगळी ओळख निर्माण केली होती. पण कुटुंबासाठी करिअरचा त्याग केला. तिने 2006 मध्ये बिझनेसमन बॉबी मुखर्जीसोबत लग्न केलं, जे फक्त सात वर्षे टिकलं. यानंतर 2013 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. अरियाना नावाची मुलगी आहे, जिची कस्टडी अभिनेत्रीकडे आहे. 

5/7

प्रदीर्घ काळानंतर पुन्हा एकदा महिमा गेल्या वर्षी चर्चेत आली होती, ही बातमी अशी होती की ती ऐकून तिच्या चाहत्यांची मनं घाबरली होती. महिमाने एक फोटो शेअर केला आहे ज्यात ती टक्कल पडलेली दिसत आहे. महिमाने सांगितले की तिला ब्रेस्ट कॅन्सर झाला आहे आणि ती शस्त्रक्रियेनंतर केमोथेरपी घेत आहे. त्यानंतर जगभरातील लोकांनी त्यांच्यासाठी प्रार्थना केली. 

6/7

आनंदाची गोष्ट म्हणजे महिमाने आयुष्यातील या सर्व अडचणींवर मात करून पुन्हा एकदा स्वत:ला उभे केलंय. आता ती लवकरच बॉलिवूडमध्ये कमबॅक करणार आहे. कंगना राणौतच्या 'इमर्जन्सी' या चित्रपटात ती पूर्णपणे नव्या रूपात दिसणार आहे. 

7/7

महिमा चौधरी चित्रपटांमध्ये काम करण्यासोबतच ती काही ब्रँडमध्येही गुंतवणूक करत असते. महिमाचे मुंबईत स्वतःचे घर आहे ज्याची किंमत सुमारे 10 कोटी रुपये आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, महिमा चौधरीची एकूण संपत्ती 60 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर महिमाला लक्झरी कारची खूप आवड आहे. महिमाकडे BMW, Audi सारख्या करोडोंच्या गाड्या आहेत.