Mahindra ने लाँच केलीये देशातील सर्वात लोकप्रिय SUV कार, जाणून घ्या काय आहेत फीचर्स?

देशातील सर्वात लोकप्रिय असणारी महिंद्रा कंपनीची कार नुकतीच लाँच केली आहे. आज आम्ही तुम्हाला या कारच्या स्पेसिफिकेशन्स बद्दल सांगणार आहेत. चला तर मग जाणून घेऊ...

Aug 13, 2022, 15:35 PM IST

मुंबई : महिंद्रा कंपनीच्या Scorpio ची लोकप्रियता अनेक वर्षांपासून अबाधित आहे. कंपनीने Scorpio च्या जुन्या मॉडेला नवीन फीचर्ससोबत Mahindra Scorpio Classic नावाने लॉंच केलं आहे. या कारच्या डिझाईनमध्ये आणि फीचर्समध्ये काही बदल केले आहेत. चला तर मग जाणून घेऊ.....

1/7

Mahindra Scorpio Classic ची साईज

नव्या तडफदार स्कॉर्पिओ क्लासिकची लांबी 4456mm, 1820mm रुंदी आणि 1995mm उंची आहे. तर या कारचा व्हीलबेस 2680mm इतका आहे.

2/7

Mahindra Scorpio Classic चे व्हेरियंट

नव्या अंदाजामध्ये लाँच झालेली महिंद्रा स्कॉर्पिओ क्लासिक Classic S आणि Classic S11 या दोन व्हेरियंट ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे. हे दोन्ही व्हेरियंट 7 आणि 9 सीट ऑप्शन्समध्ये उपलब्ध आहे.

3/7

Mahindra Scorpio Classic चं डिझाईन

महिंद्रा कंपनीची नवीन स्कॉर्पिओ क्लासिक नव्या ग्रिलडिझाईन, फॉक्स स्किड प्लेट आणि महिंद्राच्या नव्या 'ट्विन पीक्स' लोगोसोबत मिळते. क्सासिक S11 या टॉप मॉडेलमध्ये 17 इंचाचे ड्यूल टोन व्हील्स मिळते आणि क्लासिक S मध्ये स्टील व्हील्स मिळतात. 

4/7

Mahindra Scorpio Classic के फीचर्स

नव्या SUV मध्ये स्क्रीनच्या उजव्या बाजूला टच-सेंसिटिव्ह कंट्रोलसोबतच 9 इंच टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टीम दिली आहे. सेंटर कंसोलमध्ये डार्क वुडन ट्रिम इंसर्ट आणि डॅशबोर्डवर पियानो ब्लॅक इन्सर्टसोबत मिळतं. या कारचे गिअर लीवर नव्या थार प्रमाणेच आहेत.

5/7

Mahindra Scorpio Classic ची सेफ्टी

नव्या स्कॉर्पिओ क्लासिकमध्ये ड्यूल फ्रंट एअरबॅग, पॅनिक ब्रेक इंडिकेशन, इंजिन इम्मोबिलाइजर, अँटी-थेट वार्निंग, सीट बेल्ट रिमाइंडर लँप, स्पीड अलर्ट आणि ड्रायव्हिंग करताना ऑटो डोर लॉक देखील उपलब्ध आहे.

6/7

Mahindra Scorpio Classic चं इंजिन

महिंद्रा कंपनीच्या नव्या स्कॉर्पिओ क्लासिकमध्ये 2.2 लिटर 4 सिलेंडर mHawk टर्बो डिझेल इंजिन आहे. हे इंजिन 3,750rpm वर 130bhp इतकी पावर आणि 1600-2800rpm वर 300Nm इतका पीक टॉर्क जनरेट करतं.

7/7

Mahindra Scorpio Classic ची किंमत

या SUV कारला सध्या भारतात लॉंच केलं आहे. कंपनी या कारची किंमतीबाबत चालू महिन्याअखेरपर्यंत अनाउंसमेंट करु शकते. रिपोर्टनुसार, या कारची किंमत 10 लाख रुपयांपासून (एक्स-शोरुम) सुरु होईल.