मकर संक्रांतीच्यादिवशी चुकूनही ही कामे करु नका

Jan 12, 2018, 12:38 PM IST
1/9

मकर संक्राती हा हिंदूचा मोठ सण मानला जातो. पौष महिन्यात सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. हे पर्व जानेवारी महिन्यातील तेराव्या, चौदाव्या किंवा पंधराव्या दिवशी सुरु होते. या दिवशी सुखी, सफल जीवनासाठी प्रार्थना केली जाते.   

2/9

सकाळी उठताच लोक साधारणपणे चहा वा नाश्ता करतात. मात्र मकरसंक्रांतीच्या दिवशी असे करु नका. स्नान आणि पुजा करा. त्यानंतर अन्न ग्रहण करा. 

3/9

महिलांनी या दिवशी केस धुऊ नयेत.  .

4/9

मकरसंक्रांतीच्या दिवशी झाडेझुडुपांना कोणत्याही प्रकारचे नुकसान पोहोचवू नका.  

5/9

संक्रांतीच्या दिवशी लसूण, कांदा, मांस आणि अंडी यांचे सेवन करु नये.  

6/9

या दिवशी कोणत्याही प्रकारचे मद्यपान करु नये

7/9

सूर्य देवाची कृपा मिळवण्यासाठी संध्याकाळी अन्नाचे सेवन करु नका.  

8/9

मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्या वाणीवर संयम ठेवा. तसेच कोणाबद्दलही वाईट बोलू नका.  

9/9

असं म्हटलं जातं की संक्रांतीच्या दिवशी दान केल्यास तुमच्याकडे १०० टक्के परत येते. त्यामुळे या दिवशी कोणालाही घरातून रिकाम्या हाती पाठवू नका.