Makar Sankranti 2024 : हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात घ्या 'हे' खास उखाणे, सगळे म्हणतील क्या बात है!

Makar Sankranti 2024 : मकर संक्रांत म्हणजे मागचं वर्षाच्या कडू आठवणींना पुसून टाकण्यासाठी अगदी गोड असा हा सण. या सणाच्या निमित्ताने भेटीगाठी होतात. पुरुष आणि लहान मुलांना पतंग उडवण्याचा आनंद तर स्त्रियांना हळदीकुंकूचा उत्साह. यंदा हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात घ्या 'हे' खास उखाणे, प्रत्येक जण करेल तुमचं कौतुक. 

Jan 13, 2024, 19:16 PM IST
1/20

मकर संक्रांतीसाठी खास उखाणे

महालक्ष्मीच्या गळ्यात शोभते वज्रटेक आणि ठुशी …… रावांचे नाव घेते मकरसंक्रांतीच्या दिवशी  

2/20

धन्य आजचा दिवस, घरी आली आई आणि मावशी त्यांच्या आर्शीवादाने ….  रावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी  

3/20

ऊसापासून बनवतात साखर आणि गूळ …. रावांचे नाव घेते मैत्रिणींना वाटत तिळगूळ  

4/20

चांदीच्या दिव्यात लावली तूपाची वात … रावांचे नाव घेत करते हळदी कुंकवाला सुरूवात  

5/20

मकरसंक्रातीला उडवतात उंच उंच पतंग ……. रावांचे नाव घेताना मनात उठतात तरंग  

6/20

माहेर माझे बागायती, बागेत पिकल्या केळी सासरी नांदत ….. रावांचे नाव घेत मकरसंक्रांतीच्या वेळी  

7/20

मकरसंक्राती निमित्त जमल्या सख्या हळदी कुंकवाला ……. रावांचे नाव घेत आली मी तुमच्या स्वागताला  

8/20

हळदी कुंकवानिमित्त दरवळला अत्तराचा सुगंध …… रावांचे आणि माझे आहेत जन्मोजन्मींचे दृढ बंध  

9/20

तिळगूळ घ्या आणि गोड गोड बोला ……. रावांचे नाव घेण्याचे सौभाग्य लाभले मला  

10/20

सासरची माणसं माझ्या आनंदी आणि हौशी ….. रावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी  

11/20

माहेरी आणि सासरी माझ्या सुख, समृद्धीच्या  राशी ……. रावांचे नाव घेते मकरसंक्रांतीच्या दिवशी  

12/20

तिळासारखा स्नेह नांदावा आणि गुळासारखा असावा गोडवा   …… रावांचे नाव घेत सुखी संसाराचा मागते जोगवा  

13/20

मंगलक्षण आला घरी दारी बांधले तोरण ….. रावांचे नाव घेते हळदीकुंकू आहे कारण  

14/20

शंकराच्या पिंडीवर बेल वाहते वाकून …. रावांचे नाव घेते तुम्हा सर्वांचा मान राखून  

15/20

हिवाळ्याला झाली सुरूवात कधी थंडी कधी ऊन ….. रावांचे नाव घेते …. यांची लेक आणि … यांची सून  

16/20

महालक्ष्मीच्या देवळात आरती सुरू झाली मंद सुरात ….. रावांचे नाव घेते मी मात्र तोऱ्यात  

17/20

रूसलेल्या राधेला कृष्ण म्हणतो थोडी तरी हास …… रावांचे नाव घेते हळदी कुंकवासाठी खास  

18/20

पूजेला बसल्यावर आधी मान मोरेश्वर बाप्पाचा ….. रावांचे नाव घेते आर्शीवाद असो तुम्हाला सर्वांचा  

19/20

तिळा आणि गुळाची झाली गट्टी झाली… आली आली संक्रांत …. रावांचे नाव घेते मात्र त्यांचा  स्वभाव आहे शांत  

20/20

निसर्गाची किमया हवेत वाढला गारवा … रावांचे नाव घेते सर्वांना वाटत हलवा