सोलापूर: श्री सिद्धरामेश्वर यात्रेनिमित्त मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई, भाविकांची मोठी गर्दी

ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यात्रेनिमित्त मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई

Jan 13, 2024, 12:23 PM IST

ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यात्रेनिमित्त मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई

1/7

ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यात्रेनिमित्त मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई :    सोलापूरचे ग्रामदैवत असलेल्या शिवयोगी सिद्धरामेश्वर मंदिराला आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

2/7

सोलापूरच्या ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यात्रेला १३ जानेवारी पासून  सुरुवात झाली आहे. ही यात्रा ३१ जानेवारी पर्यंत असेल.१३ ते १७ जानेवारी हे यात्रेतील मुख्य दिवस मानले जातात.   

3/7

या कालावधीत महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेश असे विविध प्रदेशातून तीन ते चार लाख भाविक येतात.

4/7

यात्रच्या निमित्ताने मंदिर परिसराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे, ज्यामुळे हे दृश्य पाहतांना विलोभनीय दिसतं.

5/7

हे मंदिर तलाव परिसरात अत्यंत मध्यभागी असल्याने आकर्षक विद्युत रोषणाईची प्रतिकृती तलावात दिसत आहे.

6/7

रंगीबेरंगी विद्युत रोषणाईमुळे मंदिर परिसर उजळून काढते त्यामुळे संपूर्ण मंदिर परिसर दिव्यांनी उजळून निघतं

7/7

ग्रामदैवतांच्या यात्रेच्या काळात गावकऱ्यांकडून  विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येतं ज्यामध्ये गवकरी उत्साहाने सहभागी होतात.