Makar Sankranti 2024: मकर संक्रांती निमित्त मराठीतुन द्या 'या' खास शुभेच्छा, पहा Makar Sankranti Wishes Photo, Quotes in Marathi
Makar Sankranti Wishes in Marathi: नवीन वर्ष सुरु झाल्यावर पहिला सण येतो तो मकर संक्रांत. आपल्या जवळच्या व्यक्तीला द्या खास मराठीतून मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.
Makar Sankranti Wishes in Marathi: नवीन वर्षाचा पहिला सण मकर संक्रांत अवघ्या काही दिवसांवर आहे. सूर्य राशीपरिवर्तन करत करत जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा त्यास मकर संक्रांती म्हणतात. पौष महिन्यात सूर्य उत्तरायण होऊन मकर राशीत प्रवेश करतो ही गोष्ट देशभर वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या प्रकारे उत्सव म्हणून साजरी केली जाते. हाच दिवस आपण संक्रांत म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करतो. मकर संक्रांती हा सण उत्तर भारतात दरवर्षी 14 जानेवारीला साजरा केला जातो. यंदा हा सण सोमवारी 15 जानेवारी रोजी साजरा केला जाईल. यादिवशी आपल्या नातलगांना आपण सोशल माध्यमातून शुभेच्छा देतो. तुम्हीही शुभेच्छा देण्यासाठी मॅसेज शोधत असाल तर, अशा द्या खास शुभेच्छा.