close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

मलाइका आणि अर्जुनने एकत्र साजरी केली दिवाळी पार्टी

Nov 05, 2018, 10:28 AM IST
1/4

बॉलिवूडमध्ये सध्या अर्जुन आणि मलाइकाच्या अफेअरची चर्चा आहे. दोघेही लवकरच विवाह देखील करणार असल्याचं बोललं जातंय. पण त्याआधी दोघेही एकत्र दिवाळी साजरा करताना दिसले. 2 नोव्हेंबरला फॅशन डिझायनर संदीप खोसलाच्या दिवाळी पार्टीमध्ये दोघेही सहभागी झाले होते.

2/4

संदीप खोसलाच्या या दिवाळी पार्टीला सिद्धार्थ मल्होत्रा, ईशा गुप्ता, श्रद्धा कपूर, श्वेता बच्चन आणि करण जोहरसह अनेक कलाकारा उपस्थित होते. पण या पार्टीत प्रत्येकाची नजर फक्त 33 वर्षाच्या अर्जुन कपूर आणि 43 वर्षाच्या मलाइका अरोडावर होती.

3/4

अर्जुन आणि मलाइका पार्टीमध्ये वेगवेगळे आले आणि वेगवेगळेच गेले. दोघांनी ही मीडियापासून दूर राहण्याचा प्रयत्न केला. पण पार्टीमध्ये दोघेही एकत्रच वावरत होते.

4/4

दुसरीकडे अरबाज खान देखील त्याची गर्लफ्रेंड जियोर्जियासोबत सार्वजनिकपणे कुठेही जातो आहे. त्यानंतर मलाइका आणि अर्जुन कपूर यांनी देखील आपलं रिलेशनशिप लपवणं बंद केलं. ती अनेकदा अर्जुनसोबत त्याच्या कारमध्ये देखील दिसते. तर कधी फॅशनशोमध्ये देखील दोघे एकत्र असतात.