Skin Care : आंबा खाल्यानंतर साल फेकून देताय? थांबा! चेहऱ्यावर येईल ग्लो...

Mango Peel Benefits in Marathi : उन्हाळा ऋतु सुरु झाला की बाजारात कच्ची कैरी आणि पिकलेले आंबे दिसायला सुरुवात होते. आंब्याच्या हंगामात सार्वाधिक आंबे खरेदी केले जातात. फार कमी लोक असतील ज्यांना आंबा हे फळ आवडत नसेल. मात्र अनेकजण पिकलेले आंबे खाऊन त्यांची साल उपयोगाची नाही म्हणून फेकून देतात. पण वाढत्या उष्णतेत त्वचा खूप कोरडी होते. याला सामोरे जाण्यासाठी तुम्ही आंब्याची साल वापरू शकता. फळे आणि भाज्यांची साल अनेकदा फेकून दिली जात असली तरी, तुम्हाला माहीत आहे का की अनेक भाज्या आणि फळांच्या सालीं खूप उपयुक्त आहेत. याचप्रकारे आंब्याची साल देखील त्वचेची काळजी घेण्यासाठी खूप फायदेशीर आहे. 

May 22, 2023, 14:39 PM IST
1/6

एक्सफोलिएटिंग

Mango Peel Benefits

आंब्याच्या सालीमध्ये असलेले एन्झाईम त्वचेला हळूवारपणे एक्सफोलिएट करण्यास, त्वचेच्या मृत पेशी काढून टाकण्यास आणि त्वचा मऊ आणि कोमल ठेवण्यास मदत करतात. 

2/6

अँटी अॅक्नी

Mango Peel Benefits

आंब्याच्या सालीमध्ये अँटी बॅक्टेरिया गुणधर्म आहेत. ज्यामुळे ते मुरुमावरच्या उपचारांसाठी प्रभावी ठरते. हे मुरुमाशी संबंधित जळजळ आणि लालसरपणा कमी करण्यास देखील मदत करते. 

3/6

अँटी एजिंग

Mango Peel Benefits

आंब्याच्या सालीमध्ये अँटीऑक्सिडंट असतात जे त्वचेला फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून वाचवण्यास मदत करतात. तसेच, ते वयानुसार चेहऱ्यावर दिसणाऱ्या सुरकुत्या दूर करते आणि त्वचा तरुण आणि निरोगी ठेवण्यास मदत करते.  

4/6

टॅनिंग निघून जाईल

Mango Peel Benefits

टॅनिंगमुळे त्वचा काळी पडते. उन्हाळ्यात हा त्रास जास्त जाणवतो. हे लावण्यासाठी आंब्याची साल बारीक करुन पेस्ट बनवा नंतर त्यात एक चमचा दही घालून मिक्स करा. हा पॅक लावल्याने तुम्हाला टॅनिंगपासून आराम मिळेल.  

5/6

स्क्रबिंग करा

Mango Peel Benefits

आंबा खाल्ल्यानंतर उरलेल्या सालीपासून तुम्ही स्क्रब सुद्धा बनवू शकता. त्याचा स्क्रब बनवण्यासाठी आंब्याची साले नीट बारीक करुन नंतर त्यात कॉफी पावडर मिक्स करा. त्यानंतर हे स्क्रब चेहऱ्यावर आणि शरीरावर चांगले लावा. ते लावण्यासाठी सर्कुलर मोशनमध्ये मालिश करा.   

6/6

त्वचेवरील डाग निघून जातील

Mango Peel Benefits

जर तुमच्या त्वचेवर अनेक डाग असतील तर त्यावर उपाय करण्यासाठी तुम्ही आंब्याची साल वापरू शकता. चेहर्‍याला लावण्यासाठी आंब्याची साले नीट बारीक करुन घ्या आणि नंतर 5 मिनिटे राहू द्या. त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा पूर्णपणे स्वच्छ करा.   (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही. कृपया तज्ञांचा सल्ला घ्या.)