पावसातला स्वर्ग, भारतातील 'या' सात ठिकाणी पडतो सर्वाधिक पाऊस

जून महिन्यात दडी मारुन बसलेल्या पावसाने मुंबईसह देशभरातील विविध ठिकाणी दमदार बॅटींग करायला सुरुवात केली. पण तुम्हाला माहितेय का देशात सर्वांत जास्त पाऊस कुठे पडतो ?   

Jul 09, 2024, 14:17 PM IST

जुलैपासून पावसाचा जोर वाढायला सुरुवात होते. भारतातील असे काही ठिकाणं आहेत जिथे पावसाच्या चारही महिन्यात जोरदार बर्फवृष्टी होते. 

1/9

मावसिनराम,मेघालय

मावसिनरामट हे मेघालयातील सर्वाधिक पावसाची नोंद होणारे शहर आहे. 1985 मध्ये मावसिनरामध्ये26,000 मिलिमीटर पाऊस झाला होता. त्यामुळे मावसिनराम येथील पावसाची 'गिनीज बुक'मध्ये नोंद करण्ययात आली होती.   

2/9

अगुंबे, कर्नाटक

धार्मिक वारसा लाभलेल्या कर्नाटकाला निसर्गसौंदर्य देखील तितकच भरभरुन लाभलेलं आहे. देशातील सर्वाधिक पाऊस होणाऱ्या ठिकाणांमध्ये 'अगुंबे' शहराचा समावेश आहे. पावसाळ्यात अंगुबे शहरातील धबधबे चारही महिने ओसंडून वाहतात.   

3/9

पासीघाट, अरुणाचल प्रदेश

हिमालय पर्वतापासून जवळच असलेल्यामुळे अरुणाचप्रदेश हे राज्य थंड हवेचं ठिका ण म्हटलं जातं. पावसाळ्यात अरुणाचल प्रदेशमनधील 'पासीघाट'चं सौंदर्य खुलून दिसतं. या ठिकाणी सर्वात जास्त पाऊस पावसाची नोंद होते.   

4/9

महाबळेश्वर , सातारा

साताऱ्यातील महाबळेश्वर म्हणजे पृथ्वीवरचा 'स्वर्ग' आहे, असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. पर्वतीय भाग असल्याने महाबळेश्वरमध्ये वर्षभरात सरासरी  5000 मिमी पर्यंत पावसाची नोंद होते. 

5/9

आंबोली घाट

सातारा, कोल्हापूर आणि कोकण पट्ट्यात राहणाऱ्यांचं आवडतं ठिकाण म्हणजे आंबोली घाट,. 'आंबोली' घाटातील ओसंडून वाहणारे धबधबे आणि पसरलेलं घाटात पसरलेलं धुकं पर्यटकांना कायमच आकर्षित करतं.   

6/9

गंगटोक, सिक्किम

सिक्किममधलं 'गंगटोक' हा डोंगराळ प्रदेश आहे. त्यामुळे पावसाळी वारे अडले जातात आणि पाऊस जास्त पडतो. पावसात  गंगटोकमध्ये 17 ते  22 अंश सेल्सिअस इतकं तापमान असतं. पावसाळ्यात गंगटोकमध्ये रामटेक मठ, त्सुक ला खांग मठ,  पेमायांगत्से मठ हे बौद्ध संस्कृतीचं दर्शन देणाऱ्या मठांना पर्यटक कायमच गर्दी करतात. 

7/9

सितारगंज , उत्तराखंड

उत्तराखंडच्या डोंगराळ भागातील हे ठिकाण हिरव्यागार वनराईने समृद्ध आहे. हिमालयाच्या जवळच असलेल्यया या ठिकाणी वर्षभरात सरासरी 1700 मिमी पावसाची नोंद होते.   

8/9

चेरापुंजी ,मेघालय

भारतातील सर्वाधिक पावसाची नोंद ही 'चेरापुंजी'मध्ये होते. पावसाळ्याचे चारही महिने इथे सुर्याचं दर्शन देखील होत नाही.   

9/9

नेरियामंगलम, केरळ

देवभूमी केरळच्या निसर्गसौंदर्याचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे. केरळच्या 'नेरियामंगलम' येथे सर्वात जास्त पावसाची नोंद होते.