महाष्ट्रातील एकमेव गाव जे घराघरात विज बनवून MSEB ला विकणार; ग्रामस्थांच्या आयडियाला तोड नाही!

Manyachiwadi : मान्याचीवाडी  हे गाव महाराष्ट्रातील पहिले सौरग्राम ठरणार आहे. 

| Aug 28, 2024, 22:24 PM IST

First Solar Village of Maharashtra : महाराष्ट्रातील अनेक गावांममध्ये अद्यापपर्यंत वीज पोहचलेली नाही. अशातच साताऱ्याच्या पाटण तालुक्यात निसर्गाच्या कुशीत वसलेल्या मान्याचीवाडी गावाने राज्यातील पहिले सौरग्राम होण्याच्या दिशेने वाटचाल सुरु केली आहे.  थल्या ग्रामस्थांनी लोकसहभागातून अपारंपरिक ऊर्जानिर्मितीत राज्यासमोर नवीन आदर्श घालुन दिला आहे. 

1/7

साताऱ्याच्या पाटण तालुक्यात निसर्गाच्या कुशीत वसलेल्या मान्याचीवाडी गावाने स्वत:चा वीज प्रकल्प उभारला आहे. या गावात विज बनवून MSEB ला दिली जाणार आहे. 

2/7

 केंद्र सरकारच्या सूर्यघर योजनेअंतर्गत गावातील घरे, शाळा, ग्रामपंचायत कार्यालये, पथदिवे, पाणी पुरवठा योजना तसेच इतर कामांसाठी लागणारी 100% वीज गावातच निर्माण होणार आहे.

3/7

गावाची गरज सध्या तीनशे युनिट असून, उर्वरित दोनशे युनिट विजेची महावितरणला विक्री केली जाणार आहे.

4/7

मान्याचीवाडीमध्ये शंभर किलोवाॅट वीजनिर्मितीचा प्रकल्प उभारला जात आहे. यातून रोज पाचशे युनिट विजेची निर्मिती होणार आहे.

5/7

गावातील प्रत्येक मिळकतदाराने ‘ऑनग्रीड सौरऊर्जानिर्मिती’ची शासकीय प्रक्रिया पूर्ण केली. सध्या गावातील प्रत्येक घरावर सौरऊर्जानिर्मितीची यंत्रणा बसवली जात आहे.   

6/7

मान्याचीवाडी ग्रामस्थांनी अनेक योजना, उपक्रमांमधून पर्यावरणसंवर्धन, संतुलन राखण्याची उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्यातून ‘माझी वसुंधरा’ अभियानात राज्य शासनातर्फे ग्रामपंचायतीचा 50 लाखांचे बक्षिस देऊन दोनदा गौरव करण्यात आला. याच एक कोटी रुपयांतून ग्रामस्थांनी महत्त्वाकांक्षी सौरग्राम प्रकल्प राबवला. 

7/7

राज्य व केंद्र शासनाकडून अपारंपरिक ऊर्जानिर्मितीस प्रोत्साहन असल्याची संधी घेण्याचा  निर्णय इथल्या ग्रामस्थांनी घेतला.