Maratha Arakshan Morcha Kolhapur : आंदोलनस्थळी आमदार-खासदारांची उपस्थिती

कोल्हापुरातून मराठ्यांचा एल्गार 

| Jun 16, 2021, 11:18 AM IST

प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर :  मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मूक आंदोलनाला आजपासून सुरुवात झाली. कोल्हापूरच्या ऐतिहासिक राजर्षी शाहू समाधी स्थळावरून आंदोलनाचं रणशिंग फुंकलं जाणार आहे. कोल्हापूरसह महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांमधूनही या आंदोलनाची मशाल धगधगणार आहे. कोल्हापूरनंतर संपूर्ण महाराष्ट्रात ही आंदोलनाची मशाल जाणार आहे. 

1/7

मराठा आरक्षणासाठी खासदार संभाजी छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनास सुरुवात झाली आहे. या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही भाग घेतला आहे. 

2/7

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही आंदोलनात येऊन संभाजीराजेंना पाठिंब्यांचं निवेदन दिलं आहे.

3/7

कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, शिवसेना खासदार संजय मंडलिक मराठा आंदोलनस्थळी दाखल झाले.  छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीस्थळी दिग्गज नेते उपस्थित होते. 

4/7

वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर कोल्हापुरात दाखल, मराठा आरक्षण आंदोलनस्थळी छत्रपती शाहू महाराजांना नमन, काही दिवसांपूर्वीच संभाजीराजे यांनी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता प्रकाश आंबेडकर यांनी आंदोलनस्थळी येऊन मराठा आंदोलनाला पाठिंबा दिला.

5/7

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील मराठा मोर्चात सहभागी,  नेता म्हणून नव्हे तर कोल्हापूरचा नागरिक म्हणून मोर्चात आलो आहे, मराठा समाजासाठी जो कोणी प्रयत्न करेल त्यांना माझा आणि भाजपचा पाठिंबा असेल, येत्या अधिवेशनात सरकारने मराठा आरक्षणाबद्दल मूलभूत मागण्या मान्य कराव्या, चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.   

6/7

सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाला आरक्षण नाकारल्यानंतर, आता मराठा समाज आरक्षणासाठी पुन्हा आक्रमक झाला आहे. खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्त्वात 16 जूनपासून कोल्हापुरात मराठा मूक मोर्चाला सुरुवात होत आहे. राज्यात विविध ठिकाणी मोर्चे काढण्यात येणार आहेत.

7/7