'...म्हणून मी सिद्धेशचा पाठमोरा फोटो टाकला', पूजा सावंतने उघड केले गुपित

मराठमोळी अभिनेत्री पूजा सावंत आणि सिद्धेश चव्हाण हे 28 फेब्रुवारी 2024 रोजी विवाहबंधनात अडकले

| Mar 29, 2024, 22:38 PM IST

मराठमोळी अभिनेत्री पूजा सावंत आणि सिद्धेश चव्हाण हे 28 फेब्रुवारी 2024 रोजी विवाहबंधनात अडकले

1/9

पूजा सावंत-सिद्धेश चव्हाण सातत्याने चर्चेत

Marathi Actress Pooja Sawant Talk About why hide siddhesh chavan face during first announcement

मराठमोळी अभिनेत्री पूजा सावंत आणि सिद्धेश चव्हाण हे 28 फेब्रुवारी 2024 रोजी विवाहबंधनात अडकले. त्यांच्या मेहंदी, हळद आणि लग्नाचे फोटो सोशल मीडियावर चर्चेत होते.   

2/9

काही महिन्यांपूर्वी प्रेमाची कबुली

Marathi Actress Pooja Sawant Talk About why hide siddhesh chavan face during first announcement

पूजा सावंतने 28 नोव्हेंबर 2023 रोजी इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत प्रेमाची कबुली दिली होती. तिने सिद्धेशचा पाठमोरा फोटो पोस्ट केला होता. त्यात तिने We are engaged असे म्हटले होते. 

3/9

पूजा सावंतचा नवरा नेमका कोण? असा अनेकांना प्रश्न

Marathi Actress Pooja Sawant Talk About why hide siddhesh chavan face during first announcement

पूजा सावंतने हा फोटो शेअर केल्यानंतर अनेकजण तिचा होणारा नवरा नेमका कोण, याबद्दल चर्चा करत होते. तिच्या फोटोवर अनेकांनी वैभव तत्त्ववादी, भूषण प्रधान, आदिनाथ अशा कमेंट केल्या होत्या.   

4/9

पाठमोरा फोटो टाकल्याने चर्चांना उधाण

Marathi Actress Pooja Sawant Talk About why hide siddhesh chavan face during first announcement

आता पूजाने साखरपुड्याची घोषणा करताना सिद्धेशचा पाठमोरा फोटो का टाकला, याबद्दल भाष्य केले. तिने नुकतंच 'रेडिओ सिटी मराठी'ला मुलाखत दिली. 

5/9

भूषण, वैभव किंवा आदिनाथ अशा कमेंट्सने वेधलेले लक्ष

Marathi Actress Pooja Sawant Talk About why hide siddhesh chavan face during first announcement

यावेळी तिला पूजा तू जेव्हा सुरुवातीला फोटो टाकलास आणि सिद्धेशचा चेहरा दाखवला नव्हता, तेव्हा खूप लोकांच्या कमेंट होता की हा  भूषण, वैभव किंवा आदिनाथ आहे, असा प्रश्न विचारला. 

6/9

मी अजिबातच सरप्राईज झाले नाही

Marathi Actress Pooja Sawant Talk About why hide siddhesh chavan face during first announcement

यावर पूजा म्हणाली, "मी तुला खरं सांगू का? या कमेंट पाहिल्यावर मी अजिबातच सरप्राईज झाले नाही. कारण मी पाठमोरा फोटो टाकल्यानंतर या कमेंट्स येणार हे मला माहिती होतं. यातील पहिली दोन नाव म्हणजे भूषण आणि वैभवचं येईल हे मला माहिती होतं."   

7/9

माझं नाव फक्त दोघांसोबतच जोडलं गेलं

Marathi Actress Pooja Sawant Talk About why hide siddhesh chavan face during first announcement

"आदिनाथचं नाव का वाटलं लोकांना मला माहिती नाही. कदाचित तो साईड फेसने तसा वाटला असावा. कारण इतक्या वर्षात लोकांनी माझं नाव फक्त या दोघांसोबतच जोडलं आहे", असे पूजाने यावेळी म्हटलं.

8/9

मी फार विचारपूर्वक निर्णय घेतला

Marathi Actress Pooja Sawant Talk About why hide siddhesh chavan face during first announcement

"पण मी पाठमोरा फोटो टाकण्याचा निर्णय फार विचारपूर्वक घेतला होता. कारण माझ्या आयुष्यात काय सुरु आहे, हे कोणालाही माहिती नव्हतं", असं पूजा म्हणाली.

9/9

मी दीड-दोन वर्ष सिद्धार्थसोबत बोलतेय

Marathi Actress Pooja Sawant Talk About why hide siddhesh chavan face during first announcement

"मी दीड-दोन वर्षे सिद्धेशसोबत बोलते, याची कल्पना कोणालाही नव्हती. त्यामुळे लगेचच फोटो टाकणं आणि मी साखरपुडा केलाय हे सांगणे मला पटत नव्हतं", असेही पूजाने सांगितले.