PHOTO : सईचा झेब्रा क्रॉसिंग लूक पाहून चाहते म्हणतात, 'तू पुढे आलीस की...'

सई ताम्हणकर नेहमी हॉट आणि बोल्ड लुकने चर्चेत असते. मात्र, आता ती तिच्या नवीन झेब्रा क्रॉसिंग लुकमुळे प्रचंड चर्चेत आली आहे. 

| Oct 22, 2024, 15:35 PM IST
1/7

सई पुन्हा चर्चेत

2024 च्या सुरुवातीपासूनच सई ताम्हणकर नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणांनी चर्चेत राहिली आहे. आता देखील सई पुन्हा एकदा एका नवीन फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. 

2/7

मानवत मर्डर्स

सई ताम्हणकरच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'मानवत मर्डर्स' मधल्या समिंद्री या भूमिकेचे प्रेक्षकांनी आणि समीक्षकांनी तोंड भरून कौतुक केलं आहे. 

3/7

झेब्रा क्रॉसिंग लूक

सई ताम्हणकरने नेहमी वेगवेगळ्या भूमिका साकारून सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. सध्या देखील सई ताम्हणकर तिच्या झेब्रा लुकने पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. 

4/7

फोटोशूट चर्चेत

इंडस्ट्रीत सई ताम्हणकर ही अशी एकमेव अभिनेत्री आहे जी कॉन्सेप्ट फोटोशूट करताना दिसते. याच वेगळेपणामुळे सईच लेटेस्ट फोटोशूट चर्चेत आलं आहे. 

5/7

भन्नाट कमेंट्स

या फोटोमध्ये सई ताम्हणकर झेब्रा क्रॉसिंग थीमवरच्या आउट फिटमध्ये दिसत आहे. चाहत्यांनी तिच्या या फोटोशूटवर भन्नाट कमेंट्स तर केल्याच आहेत पण भरभरून मीम्स देखील केल्या आहेत.

6/7

मीम्स

सईच्या चाहत्यांनी एकापेक्षा एक मीम्स बनवून हा लूक अजून जास्त चर्चेत आणला आहे. एका चाहत्यांने हा झेब्रा लूक भारताबाहेर गेला नाही पाहिजे असं म्हटलं आहे. 

7/7

फोटो शेअर

तर दुसऱ्या चाहत्याने हाऊ टू कंट्रोल व्हीएकल असा मीम्स क्रिएट केला आहे. सईने हे सगळे मीम्स तिच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत.