तरुणींना वयाने मोठे पुरुष का आवडतात?

तरुण मुली वयाने मोठ्या असलेल्या पुरुषांकडे आकर्षित होतात. यामागची 7 कारणे महत्त्वाची. 

| Oct 22, 2024, 14:38 PM IST

तरुण मुली वयाने मोठ्या असलेल्या पुरुषांकडे का आकर्षित होतात? याला पुरुषांमधील चार्म, शहाणपण किंवा अनुभव कारणीभूत आहे का? वयाने मोठ्या असलेल्या पुरुषांमध्ये नेमकं असं काय आहे?
 ज्यामुळे या तरुणी वयाने मोठ्या असलेल्या पुरुषांकडे जास्त आकर्षित होतात? असे दिसून येते की, महिलांना आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या पुरुषांबाबत अतिशय सुरक्षिततेची भावना असते. तसेच त्यांच्याकडून मिळणारी काळजीची भावना ही या तरुणींना हवीहवीशी असते. 

1/7

वयाने मोठ्या पुरुषाशी का करतात लग्न

मुलीपेक्षा मुलगा लग्नासाठी वयाने मोठाच पाहिला जातो. ही अनेक लग्नसंस्थामध्ये परंपरा आहे. या परंपरेचं कारण म्हणजे मुलींना वयाने मोठ्या असलेल्या पुरुषासोबत सुरक्षिततेची भावना असते. यासोबत आणखी कोणती कारण आहेत, ती आज आपण पाहूया.   

2/7

मॅच्युरिटी

वयाने मोठ्या असलेल्या पुरुषांमध्ये योग्य प्रमाणात अशी मॅच्युरिटी असते. अशावेळी हे पुरुष कठीण प्रसंगात अतिशय सामंजस्यपणे वागत असतात. तसेच त्यांच्यातील संवाद हा अतिशय महत्त्वाचा असतो. 

3/7

शहाणपण

वयाने मोठ्या असलेल्या पुरुषांमध्ये असलेलं शहाणपण हे नक्कीच वाखाण्याजोगे असते. अशा पुरुषांमध्ये समंजसपणा, सहनशक्ती मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे तरुण मुलींना वयाने मोठ्या असलेल्या  पुरुषांबाबत आकर्षण वाटते. 

4/7

लूक्स

मोठ्या वयाच्या तरुणांमध्ये निटनेटकेपणा, टापटीपणा असतो. जो अनेक मुलींना आकर्षित करत असतो. वयाने मोठे असलेले पुरुष प्रेझेंटेबल असतात. त्यांच्यातील आत्मविश्वास, हजरजबाबीपणा तरुणींना सर्वाधिक आकर्षिक करतात.   

5/7

लाड करण्याचा गुण

वयाने मोठे असलेले पुरुष तरुणींचे लाड करत असतात. मुलींना पॅमपरिंग करणारा, लाड करणारा पुरुष आवडतो. अशावेळी वयाने मोठे असलेले पुरुष तरुणींना सर्वात जास्त आकर्षित करतात. 

6/7

लग्न करुन सेटल्ड होण्यासाठी

अनेक तरुण मुलींना सेटल्ड नवरा हवा असतो. अशावेळी त्यांच्यापेक्षा वयाने मोठा असलेला पुरुष त्यांना नक्कीच योग्य निर्णय वाटतो. तरुणींना लग्न करण्यासाठी योग्य पुरुष म्हणून वयाने मोठ्या पुरुषांची निवड करतात. तरुण मुलांमध्ये असलेला उथळपणा वयाने मोठ्या पुरुषांमध्ये नसतो.   

7/7

यशस्वी लग्न

तरुण मुलींना आपली काळजी घेणारा पुरुष हवा असतो. कारण त्यांना त्यांच्यातील अल्लडपणा जपणारा पुरुष हवा असतो. वयाने मोठे असलेला पुरुष तरुणींची तशा पद्धतीने काळजी तर घेतोच. पण हे लग्न टिकवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो.