पोस्ट ऑफिसच्या या योजनेत PM मोदींची 9 लाखाहून अधिक गुंतवणूक, कसे मिळतात रिटर्न्स?

May 19, 2024, 11:29 AM IST
1/9

पोस्ट ऑफिसच्या या योजनेत PM मोदींची 9 लाखाहून अधिक गुंतवणूक, कसे मिळतात रिटर्न्स?

PM Narendra Modi invested in Post Office NSC Scheme investment Marathi News

PM Narendra Modi investment: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसीमधून उमेदवारी अर्ज भरला तेव्हा त्यांच्याकडे किती संपत्ती आहे? याबद्दल अनेकांना उत्सुकता होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मालमत्तेतील गुंतवणुकीचा खुलासा केला. ज्यामध्ये पोस्ट ऑफिस योजनेचाही उल्लेख त्यांनी केला आहे.

2/9

पंतप्रधानांची गुंतवणूक

PM Narendra Modi invested in Post Office NSC Scheme investment Marathi News

ही योजना राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC) म्हणून ओळखली जाते. पंतप्रधानांनी या योजनेत 9.12 लाख रुपयांची गुंतवणूक केली आहे. एनएससी ही एक ठेव योजना आहे. ज्यामध्ये  तुम्ही 5 वर्षांसाठी रक्कम गुंतवू शकतात. 

3/9

7.7 टक्के व्याज

PM Narendra Modi invested in Post Office NSC Scheme investment Marathi News

सध्या या स्किममध्ये 7.7 टक्के व्याज मिळत आहे. या योजनेत गुंतवणूक करून तुम्ही उत्कृष्ट परतावा देखील मिळवू शकता. या योजनेशी संबंधित खास गोष्टी समजून घेऊया.

4/9

संयुक्त खाते उघडू शकता

PM Narendra Modi invested in Post Office NSC Scheme investment Marathi News

कोणताही भारतीय नागरिक एनएससी स्किममध्ये गुंतवणूक करू शकतो. तुम्ही एकट्याचे किंवा दोन ते तीनजण मिळून संयुक्त खाते उघडू शकतात. पालक त्यांच्या अल्पवयीन व्यक्तीच्या नावावर गुंतवणूक करू शकतात. तर 10 वर्षांपर्यंतच्या मुलांच्या नावे तुम्ही एनएससी खरेदी करू शकतात. 

5/9

1 हजार रुपयांपासून गुंतवणूक

PM Narendra Modi invested in Post Office NSC Scheme investment Marathi News

तुम्ही एकाच वेळी अनेक NSC खाती देखील उघडू शकता. NSC मधील गुंतवणूक किमान 1 हजार रुपयांपासून सुरू केली जाऊ शकते आणि कमाल गुंतवणुकीसाठी कोणतीही मर्यादा नाही. म्हणजेच तुम्ही त्यात कितीही कमाल रक्कम गुंतवू शकता. 

6/9

80C अंतर्गत कर लाभ

PM Narendra Modi invested in Post Office NSC Scheme investment Marathi News

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेत 9,12,000 रुपयांची गुंतवणूक केली आहे. या योजनेवर 80C अंतर्गत कर लाभ देखील उपलब्ध आहे. तुम्हीदेखील रक्कम गुंतवल्यास तुम्हाला किती परतावा मिळेल? याबद्दल जाणून घेऊया. 

7/9

9 लाख 12 हजार रुपये इतकी रक्कम गुंतवली तर

PM Narendra Modi invested in Post Office NSC Scheme investment Marathi News

जर तुम्ही देखील 9 लाख 12 हजार रुपये इतकी रक्कम गुंतवली तर सध्याच्या व्याजदरानुसार तुम्हाला 5 वर्षात फक्त व्याजातून 4 लाख 9 हजार 519 रुपये मिळू शकतात. अशा प्रकारे तुम्हाला मॅच्युरिटीवर एकूण 13 लाख 21 हजार 519 रुपये मिळतील. जर तुम्ही 9 लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला 4 लाख 04 हजार 130 रुपये व्याज मिळेल. तसेच13 लाख 04 हजार 130 रुपये ही तुमची मॅच्युरिटी रक्कम असेल.

8/9

1 लाख ते 5 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर किती परतावा मिळतो?

PM Narendra Modi invested in Post Office NSC Scheme investment Marathi News

तुम्ही 1 लाख रुपयांच्या गुंतवणुक केली असेल तर तुम्हाला 44 हजार 903 रुपये व्याज आणि मॅच्युरिटी रक्कम 1 लाख 44 हजार 903 रुपये इतकी मिळेल. 2 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर 89 हजार 807 रुपये व्याज आणि मॅच्युरिटी रक्कम 2 लाख 89 हजार 807 रुपये असेल.3 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर तुम्हाला 1 लाख 34 हजार 710 रुपये व्याज आणि मॅच्युरिटी रक्कम 4 लाख 34 हजार 710 रुपये असेल.

9/9

4 ते 5 लाखाच्या गुंतवणुकीवर

PM Narendra Modi invested in Post Office NSC Scheme investment Marathi News

4,00,000 रुपयांच्या गुंतवणुकीवर 1 लाख 79 हजार 614 रुपये व्याज आणि मॅच्युरिटी रक्कम 5 लाख 79 हजार 614 रुपये असेल. 5 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर 2 लाख 24 हजार 517 रुपये व्याज आणि मॅच्युरिटी रक्कम 7 लाख 24 हजार 517 रुपये असेल.