कोरोनापेक्षाही गंभीर Marburg Virus ची एन्ट्री, काय आहेत लक्षणं?

नाक आणि प्रायवेट पार्टमधून रक्त येतं असेल तर सावधान! वेळीच डॉक्टरचा सल्ला घ्या...कोरोना एवढेच आला गंभीर व्हायरस कोणता आणि काय लक्षणं वाचा सविस्तर

Aug 10, 2021, 23:21 PM IST

जिनेवा: जगभरात कोरोना व्हायरस थांबण्याचं नाव घेत नाही. आता डेल्टा आणि डेल्टा प्लसचा धोका आहे. असं असताना आता पश्चिम अफ्रिकी देशात गिनी इथे एका नव्या व्हायरसनं थैमान घातलं आहे. मारबर्ग वायरस (Marburg Virus)चा संसर्ग झाल्याची घटना समोर आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं या व्हायरस संदर्भात माहिती दिली आहे. 

1/8

मारबर्ग वायरस (Marburg Virus) हा इबोला आणि कोरोनापेक्षा जास्त धोकादायक असल्याचं मानलं जात आहे. जनावरांमधून माणसांमध्ये हा व्हायरस पसरला आहे. सर्वात पहिल्यांदा 2 ऑगस्टला या व्हायरसचा संसर्ग झालेला व्यक्तीचा मृत्यू झाला त्यानंतर लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. 

2/8

WHOने दिलेल्या माहितीनुसार मारबर्ग वायरस (Marburg Virus) हा देखील वटवाघळांपासूनच पसरला आहे. त्याचा मृत्यूदर 88 टक्के एवढा आहे. 'मारबर्ग वायरस पसरू नये म्हणून आताच त्यावर नियंत्रण मिळवणं गरजेचं असल्याचं आफ्रिकेतील डॉक्टरांचं म्हणणं आहे. 

3/8

गेल्या वर्षाच्या सुरुवातीला 12 लोकांचा इबोलामुळे मृत्यू झाला होता. मात्र आता इबोला, कोरोना आणि या व्हायरसचा संसर्ग असा धोका असल्यानं नागरिकांमध्ये भीती आहे. हा व्हायरस अजून पसरू नये यासाठी उपययोजना काय करता येतील यावर सध्या काम सुरू आहे. 

4/8

WHO ने दिलेल्या माहितीनुसार एखादा व्यक्ती ज्याला संसर्ग झाला असेल आणि तो तुमच्या संपर्कात आला तर Liquid substance द्वारे संसर्ग होऊ शकतो. त्यावेळी जर संसर्ग झालेल्या व्यक्तीला उपचार तातडीने मिळाले नाहीत तर त्याचा मृत्यू होतो. 

5/8

या आजाराची लक्षणं म्हणजे ताप येऊ शकतो याशिवाय डोकं दुखतं. याशिवाय अंग दुखतं तिसऱ्या दिवशी लूज मोशन, पोटात दुखणं आणि उल्ट्या सुरू होतात. याशिवाय रुग्णाचे डोळे जड होतात चेहऱ्यात बदल जाणवतात आणि सुस्ती येते. या आजारात काही वेळा रुग्णांच्या नाकातून किंवा गुप्तांगातून रक्तही येण्याचा धोका आहे. 

6/8

गंभीर लक्षणांमध्ये संभ्रम, चिडचिडेपणा, ताप आणि विचित्र वागणं ही लक्षणं आहेत. 15 दिवसांत ऑर्काइटिससारखा आजारही दिसू लागतो. तर अति गंभीरमध्ये हीच स्थिती कायम राहून रुग्णाच्या जीवावर बेतू शकतं त्यामुळे तातडीनं उपचार मिळणं गरजेचं असतं. 

7/8

1967 मध्ये, जर्मनीतील मारबर्ग आणि फ्रँकफर्ट बेलग्रेड, सर्बिया येथे हा रोग आढळून आला. युगांडाहून आलेल्या आफ्रिकन हिरव्या माकडांवर (Cercopithecus aethiops) अभ्यासात हे आढळून आले. यानंतर, अंगोला, कांगो लोकशाही प्रजासत्ताक, केनिया, दक्षिण आफ्रिका आणि युगांडामध्ये प्रकरणे नोंदवली गेली. 

8/8

2008 मध्ये, युगांडामधील गुहेला भेट दिलेल्या दोन प्रवाशांमध्ये हा विषाणू आढळला. अभ्यासात सापडलेला विषाणू सहसा गुहेत किंवा खाणींमध्ये असतो जेथे रोउसेटस वटवाघू राहतात. एकदा एखाद्या व्यक्तीला विषाणूची लागण झाली की मग कोरोनाप्रमाणे हा संसर्ग देखील वेगाने पसरतो.