ब्रह्मे घरची दिवाळी ठरणार आतीशबाजीची!

सई आणि आदित्य साजरी करणार खास दिवाळी 

| Nov 11, 2020, 12:40 PM IST

मुंबई : खास सूत्रांकडून कळलेल्या बातमीनुसार झी मराठीवरील ‘माझा होशील ना’ ही मालिका दिवाळीच्या काळात निर्णायक टप्प्यावर येऊन पोहोचणार आहे. नाव न सांगण्याच्या अटीवर, सेटवरील एका व्यक्तीकडून असं समजलं की, सई आणि आदित्यमधली वाढत जाणारी मैत्री आणि बॅांडींग तर सगळ्यानीच पाहिलं होतं, पण आता ब्रह्मे घरची सून होण्याच्या दिशेने सईची पावलं वेगात पडणार आहेत.

1/5

ब्रह्मे घरची दिवाळी ठरणार आतीशबाजीची!

ब्रह्मे घरची दिवाळी ठरणार आतीशबाजीची!

दिवाळीत तर मोठी आतीशबाजी आणि घटना घडणार आहेत. स्वयंपाकाचा जराही गंध नसलेली सई जेव्हा फराळ बनवण्याच्या निमित्ताने ब्रह्मेंकडे येईल तेव्हा फराळाबरोबरच ह्या घरची सून होण्यासाठी कुठल्या गुणांची गरज आहे हेही शिकेल.

2/5

ब्रह्मे घरची दिवाळी ठरणार आतीशबाजीची!

ब्रह्मे घरची दिवाळी ठरणार आतीशबाजीची!

आप्पांकडून ह्या घरच्या सूनेसाठी ठेवलेल्या बांगड्या मिळवेल. पण आदर्श सूनेची परिक्षा सई पास होते आहे की काय असं वाटत असतानाच, दापोलीला गेलेला दादामामा आदित्यचं मेघनाशी लग्न ठरवून मोकळा होणार आहे म्हणे

3/5

ब्रह्मे घरची दिवाळी ठरणार आतीशबाजीची!

ब्रह्मे घरची दिवाळी ठरणार आतीशबाजीची!

आणि हा जबर धक्का सई आणि आदित्यच्या नात्याला बसणार आहे. ह्या धक्क्याने आदित्य आणि सईला एकमेकांमधे असलेल्या नात्याचा अर्थ आणि गांभीर्य समजणार का? मेघनाशी होणारं लग्न मोडून आदित्य सईवर प्रेम असल्याचं जाहिर करणार का? आणि ह्या साऱ्याचा दादामामा आणि एकूणच ब्रह्मे घरावर काय परिणाम होणार हे मात्र सांगण्यात आलेले नाही.

4/5

ब्रह्मे घरची दिवाळी ठरणार आतीशबाजीची!

ब्रह्मे घरची दिवाळी ठरणार आतीशबाजीची!

आता हे पाहण्यासाठी यंदाची दिवाळी आणि त्या आसपासचे भाग चुकवून चालणार नाहित. कारण, सई आदित्यचं प्रेम आता जाहिर होण्याच्या मार्गावर तर आहेच, पण त्या प्रेमासाठी जवळच्या माणसांविरूद्ध उभं राहण्यासाठी भाग पाडणारं आहे! तेव्हा ‘माझा होशील ना’ ह्या मालिकेचा एकही भाग चुकवू नका!  

5/5

ब्रह्मे घरची दिवाळी ठरणार आतीशबाजीची!

ब्रह्मे घरची दिवाळी ठरणार आतीशबाजीची!