New Generation of Business : अंबानींपासून टाटांपर्यंत; पाहा या उद्योगसमुहांची नवी पिढी

देशाच्या व्यवसाय (Business Sector) आणि उद्योग क्षेत्रात मोलाचं योगदान देत थेट अर्थव्यवस्थेलाच (indian Economy) हातभार लावणाऱ्या उद्योग समुहांमध्ये अंबानी, अदानी, टाटा आणि विप्रो या उद्योग समुहांचा समावेश होते. गेली कित्येत वर्षेया उद्योग समुहांनी अनेकांना नोकरीच्या संधी दिल्या. नाही म्हटलं तरी देशाला असंख्य क्षेत्रांमध्ये पुढे नेण्यास हातभार लावला. अशा या बड्या उद्योग समुहात सध्याचा काळ अतिशय महत्त्वाचा आहे. कारण, हा काळ आहे उद्योग आणि संपूर्ण व्यवहाराची जबाबजारी पुढच्या पिढीकडे सोपवण्याचा.

Nov 28, 2022, 12:19 PM IST

Business News : देशाच्या व्यवसाय (Business Sector) आणि उद्योग क्षेत्रात मोलाचं योगदान देत थेट अर्थव्यवस्थेलाच (indian Economy) हातभार लावणाऱ्या उद्योग समुहांमध्ये अंबानी, अदानी, टाटा आणि विप्रो या उद्योग समुहांचा समावेश होते. गेली कित्येत वर्षेया उद्योग समुहांनी अनेकांना नोकरीच्या संधी दिल्या. नाही म्हटलं तरी देशाला असंख्य क्षेत्रांमध्ये पुढे नेण्यास हातभार लावला. अशा या बड्या उद्योग समुहात सध्याचा काळ अतिशय महत्त्वाचा आहे. कारण, हा काळ आहे उद्योग आणि संपूर्ण व्यवहाराची जबाबजारी पुढच्या पिढीकडे सोपवण्याचा. यापैकी काही समुहांनी फार आधीच तरुण पिढीला मोठी सूत्र हाताळण्याची संधी दिली, तर काही आता त्या वाटेवर असल्याचं पाहायला मिळत आहे. (meet the new generation of adani ambani tata and wipro group of industries )

1/6

meet the new generation of adani ambani tata and wipro group of industries

मुकेश अंबानी (Mukesh Ambani) रिलायन्स उद्योग समुहाला (Reliance group of industries) एका वेगळ्या उंचीवर नेणाऱ्या मुकेश अंबानी यांनी फार आधीच त्यांच्या कामाची सूत्र मुलांच्या हाती सोपवली. लेक ईशा अंबानीलाही (Isha ambani) त्यांनी रिलायन्समध्ये महत्त्वाची भूमिका बजावण्याची संधी दिली. आकाश (akash and anant ambani) चेअरमन आणि स्टॅटर्जी हेड असतानाच ईशाकडे त्यांनी रिलायन्स रिटेलची धुरा सोपवली.   

2/6

meet the new generation of adani ambani tata and wipro group of industries

अजय पिरामल (Ajay Piramal) Piramal Group च्या अध्यक्षपदी अजय पिरामल असले, तरीही त्यांची मुलही नंदिनी पिरामल एंटरप्राइजेसच्या सीईओपदील असून ओवर-द-काउंटर  औषधांच्या व्यवसायाची पाहणी करते. तर, मुलगा आणि अंबानींचा जावई (isha Ambani husband) आनंद पिरामल (anand Piramal) या समुहाचा Non-Executive Director आहे. शिवाय पिरामल रियल्टीचाही तो संस्थापक आहे.   

3/6

meet the new generation of adani ambani tata and wipro group of industries

गौतम अदानी  बंदरांपासून वीजनिर्मीतीपर्यंत बहुविध व्यवसायांमध्ये योगदान देणाऱ्या गौतम अदानी (Gautam Adani) यांनी त्यांच्या या वाढत्या कामाचा भार आला करण अदानी या आपल्या लेकावर सोपवला आहे. अंबुजा सिमेंटमध्ये (Ambuja cement) त्याला Non-Executive Director हे पद देण्यात आलं आहे. तर, ACC मध्येही त्याच्यावर Non-Executive Chairperson ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे.   

4/6

meet the new generation of adani ambani tata and wipro group of industries

रतन टाटा  रतन टाटा (Ratan tata) यांनी मोठ्या केलेल्य़ा टाटा ग्रुपमध्येही नव्या पिढीचा प्रवेश झाला आहे. काही दिवसांपूर्वीच Tata Group च्या सब्सिडियरी टाटा मेडिकल सेंटर ट्रस्ट (Tata Medical Centre Trust) साठी रतन टाटा यांचे भाऊ नोएल टाटा यांच्या मुलांची नियुक्ती करण्यात आली आहे. लेह (Leah Tata), माया (Maya Tata) आणि नेविल (Neville Tata) अशी या तिघांची नावं.   

5/6

meet the new generation of adani ambani tata and wipro group of industries

अनिल अंबानी  अनिल अंबानी यांनी रिलायन्स कॅपिटलमध्ये (Anil Ambani reliance capital) जय अनमोल अंबानी याला सीओडी हे पद दिलं आहे. रिलायन्स इन्फ्राच्या संचालकपदीही तो सक्रीय आहे. याआधी हे पद जय अंशुल अंबानीला देण्यात आलं होतं. पण, त्यानं मात्र या पदाचा त्याग केला होता.   

6/6

meet the new generation of adani ambani tata and wipro group of industries

अझिम प्रेमजी  भारतातील तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या विप्रो (Wipro) या आयटी कंपनीची बरीच सूत्र अझिम प्रेमजी (Azim Premji) यांनी फार आधीच मुलगा रिशद प्रेमजी याच्यावर व्यवसायाच्या जबाबदाऱ्या सोपवल्या होत्या. अजिम यांचा दुसरा मुलगा तारिक प्रेमदी अजिम प्रेमजी एंडोमेंट फंडचा उपाध्यक्ष आहे.